'माझे आई-वडील व माझ्या मुलाची काळजी घ्या'; व्हॉटस्ॲप स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 07:35 IST2021-02-09T02:34:56+5:302021-02-09T07:35:10+5:30

आत्महत्येचे कारण समजू शकले नाही

Young man commits suicide by keeping WhatsApp status | 'माझे आई-वडील व माझ्या मुलाची काळजी घ्या'; व्हॉटस्ॲप स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या

'माझे आई-वडील व माझ्या मुलाची काळजी घ्या'; व्हॉटस्ॲप स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या

महाबळेश्वर (जि. सातारा) : ‘माझे आई-वडील व माझ्या मुलाची काळजी घ्या’, असा स्टेटस मोबाईलवर लिहून क्रिकेट खेळाडू संदीप सुभाष भिलारे (३५, रा. गणेशनगर सोसायटी, महाबळेश्वर) याने रविवारी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 

स्थानिक पातळीवरील क्रिकेट सामन्यातील अष्टपैलू खेळाडू संदीप भिलारे  याने आपल्या मोबाईल स्टेटसला ‘माझ्या आई-वडिलांची व मुलाची काळजी घ्या’, असा मजकूर ठेवला होता. संदीपचा हा स्टेटस पाहून रविवारी रात्री काही मित्रांनी संदीपच्या जवळच्या नातेवाईकांना फोन करून ही माहिती दिली. यानंतर नातेवाईक संदीपच्या घरी गेले.  त्याच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. अनेक हाका मारल्या, दारावरची बेल वाजवली, तरीही घराचा दरवाजा उघडला नाही, म्हणून नातेवाईकांनी दरवाजा जबरदस्तीने उघडल्यावर संदीपने साडीने गळफास घेतल्याचे दिसले. संदीप याचा प्रेमविवाह झाला होता. त्याला एक वर्षाचा मुलगा आहे.

Web Title: Young man commits suicide by keeping WhatsApp status

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.