शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

राजीनामा देऊन मुर्खपणा केलाय, आता मातोश्रीत आराम करा; नारायण राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

By नितीन काळेल | Updated: May 12, 2023 19:20 IST

'भाजपचे मंगळसूत्र बांधून एकत्र नांदले आणि नंतर शरद पवारांचा हात धरुन गेले'

सातारा : ‘भाजपचे मंगळसूत्र बांधून एकत्र नांदले आणि नंतर शरद पवारांचा हात धरुन गेले. मुख्यमंत्री असतानाही मातोश्री कधी सोडली नाही. आता त्यांनी तेथेच आराम करावा आम्हाला नैतिकता शिकवू नये. त्यांनी राजीनामा देऊन मुर्खपणा केलाय,’ असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. तर संजय राऊतांचे नाव काढू नका, डिप्रेशनमध्ये माणूस गेलाय, त्यांनीच शिवसेनेला संपवलंय, असा प्रहारही केला.सातारा येथे उद्योजक परिषदेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री नारायण राणे आले होते. त्यांच्याबरोबर केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड हेही होते. उद्योजक परिषद झाल्यानंतर भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर चांगलेच तोंडसूख घेतले.मंत्री राणे म्हणाले, ’साताऱ्यात उद्योग वाढावेत, रोजगार वाढावा तसेच लोकांचेही उत्पन्न वाढण्यासाठी उद्योजक परिषद घेण्यात आली. कारण, जिल्ह्याची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी उद्योग हीच एक व्यवस्था आहे. आता साताऱ्यासाठीही आवश्यक ती मदत मी आणि मंत्री भागवत कराड हे करणार आहोत. कारण, पश्चिम महाराष्ट्रातील हा भाग प्रगत समजला जातो. पण, दरडोई उत्पन्नात तसा दिसत नाही. येथील राजकारण हे उद्योगांकडे वळावे असे वाटते.

'तसे' आम्ही करणार नाहीसर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागला आहे. यावर आपली प्रतिक्रिया काय? यावर मंत्री राणे यांनी निकाल आला मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांचे सरकार सत्तेवर आहे. सर्वत्र आबादीआबाद आहे. विकासकामे सुरू आहेत, असे हसत-हसत सांगितले. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारने नैतिकता असेल तर राजीनामा देऊन निवडणूक घ्यावी, असे आव्हान दिल्याचा प्रश्नही पत्रकारांनी केला. यावर मंत्री राणे यांनी त्यांना घरी बसवले आहे. त्यांनी तेथेच आराम करावा व मातोश्री चांगली ठेवावी. ते मुख्यमंत्री नावालाच होते. २ तासच मंत्रालयात गेले. मातोश्री कधी सोडली नाही. राजीनामा देऊन मुर्खपणा केला. तसे आम्ही करणार नाही.२०२४ ची निवडणूक जवळच आली आहे. त्यावेळी काय ते बघूया. दुसऱ्यांचा हात धरुन ते गेले तेव्हा त्यांच्याकडे नैतिकता किती आहे, हे दिसून आले आहे, असा टोमणाही मारला. तर विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपच्या संपर्कात असल्याचा प्रश्न उपस्थित केल्यावर त्यांनी राजकारणात सर्वच गोष्टी उघड करायच्या नसतात, असे स्पष्ट केले. 

आमदार १२ वर आलेल्याचा अंत जवळ...ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा मंत्री राणे यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला. त्यांचे कोणतेच भाकीत खरे ठरत नाही. सरकार पडणार, आमदार अपात्र ठरणार म्हणाले, पण काय झाले. वेडसर माणूस आहे, त्यांनीच शिवसेना संपवली असे राऊतांवर वाकबाण सोडले. तर त्यांच्याकडे ५६ आमदार होते. आता संख्या १२ वर आली आहे. यामुळे ठाकरे यांचा अंत जवळ आलाय, असेही राणे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री नावालाच...विधानसभा अध्यक्षांनी महिन्यात अपात्र आमदारांबद्दल निर्णय घ्यावा, नाहीतर आम्ही न्यायालयात जाऊ असे ठाकरे गटाने म्हटल्याचा प्रश्नही पत्रकारांनी केला. यावर राणे यांनी त्यांना कायदे माहीत नाहीत. घर कधी सोडले नाही. अध्यक्षाला कालमर्यादा कधी असते का ? त्याचा अभ्यास करावा, असा टोमणेवजा सल्ला ठाकरे यांनी दिला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNarayan Raneनारायण राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्री