योगराज यांची धोनीवर टीका

By Admin | Updated: April 7, 2015 23:29 IST2015-04-07T23:29:15+5:302015-04-07T23:29:15+5:30

युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर अत्यंत खालच्या स्तरावरील टीका केली. त्यांनी धोनीची तुलना रावणाशी केली.

Yograj criticized Dhoni | योगराज यांची धोनीवर टीका

योगराज यांची धोनीवर टीका

कऱ्हाड : कऱ्हाड आगारातील फलाटावर विनाफलकाचीच गाडी उभी केली जात असल्याने प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्याचबरोबर अशा घडणाऱ्या प्रकाराबाबत नागरिकांतुन संताप व्यक्त होत आहे. विनाफलकाच्या गाडीमुळे प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतय. मंगळवारी कऱ्हाड बसस्थानकामध्ये असाच प्रकार पहायला मिळाला. बसस्थानकाच्या फलाटावर लावण्यात आलेल्या एस. टी. कोणत्या गावाची आहे याची माहिती त्या विनाफलकाच्या गाडीकडे बघत तेव्हा जो - तो एकमेंकांना विचारीत होता ही कुंची गाडी हायरं बाबा.... यावर नाव का लिहलं नाही. खेडेगावातून आलेल्या म्हातारीने जवळच उभ्या असलेल्या दुसऱ्या प्रवाशांना विचारला असता या प्रश्नाचं उत्तर तिथं उभ्या असणाऱ्या अनेकांनाही पडलं.
दररोज एस. टी. चा प्रवास आता गावाकडील लोकांना नकोसा झाला आहे. यामागचं कारण एस. टी महामंडळाकडून केलं जाणारं प्रवाशांकडं दुर्लक्ष हे आहे. त्यामुळे तोडक्या - मोडक्या गाड्यातून प्रवास करण्यापेक्षा जो-तो खासगी वडाप अन् रिक्षानं प्रवास करण्यातच धन्यता मानू लागला आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी म्हणून मिरवणाऱ्या एस. टी. गाड्यांना सध्या बुरे दिन आले आहेत. कऱ्हाड आगारात सध्या बसगाड्यांवर फलक असूनही देखील ते लावले जात नसल्याने याकडे वरिष्ठ अधिकारी कधी लक्ष देणार असा प्रश्न प्रवाशी वर्गातून केला जात आहे.
याबाबत ‘लोकमत’ने बसस्थानकात येणाऱ्या लोकांकडून बसस्थानकातील अडचणींबाबत व समस्यांविषयी माहिती घेतली असता त्यांच्याकडून बसस्थानकाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली . भरीव निधी कामाविना तसाच पडून असल्याने आता या बसस्थानकांच्या नुतनीकरणाचं घोंगड किती दिवस भिजत राहणार, मोडलेल्या गाड्यापासून कधी सुटका मिळणार, गाड्यातील चालक अन् वाहकाला कधी शिस्तीचं महत्व पटणार अशा एक ना अनेक प्रकारच्या समस्या नागरिकांनी मांडल्या. अशाच प्रकारे महाविद्यालय व शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या अन् तक्रारीची पत्रे तर अधिकाऱ्यांकडे पोत्याने सापडतील अशा एक ना एक अनेक तक्रारी प्रवाशांनी मांडल्या.
कऱ्हाड आगार हे असुविधांचे माहेरघरच असल्याचा सध्या सर्व जिल्हाभर नावलौकिक होत आहे. काचेवर खडूने गावाचे नाव लिहून कशी बशी गावापर्यंत गाडी घेवून जायची असे काम दररोज नित्यनेमाने वाहक आणि चालकांकडून केलं जात आहे. गाडीतील बिगाडी हि आता कऱ्हाडकरांच्या दररोजच्या प्रवासातील झाली असल्याने यापासुन आपली कधी सुटका होणार नाही अन् आपल्या नशिबी आलीशान व आरामदायी गाडीचा प्रवास कधी करता येणार अशा व्यथा प्रवाशांकडून मांडण्यात आल्या.
बसस्थानकासाठी ११ कोटी निधी मंजुर असताना देखील आता नव्या कोऱ्या गाड्यांची गरज भासू लागली आहे. त्यामध्ये आहे त्या सुविधांचा उपभोग घेण्या ऐवजी त्या सुविधांना कशाप्रकारे टाळता येईल असा प्रकार सध्या बसस्थानक परिसरात घडत आहे.चालकांच्या आळशी स्वभावामुळे की विभाग नियंत्रकांच्या दुर्लक्षीतपणामुळे सध्या हा प्रकार बस स्थानकामध्ये राजरोसपणे पहायला मिळतो आहे. याकडे आगारप्रमुखांनी लक्ष द्यावे अशी मागणीही प्रवाशी वर्गातून होत आहे.


फलक असून देखील का लावत नाही ?
कऱ्हाड ते कोरेगाव या मार्गावर कधी कधी गाडयाच नसतात. असल्यातरी त्या वेळेवर लावल्या जात नाहीत. कऱ्हाड बसस्थानकातून दररोज अनेक बसगाड्या तालुक्यातील खेड्या पाड्यांमधील प्रवाशांची वाहतूक करतात. मात्र, ज्यावेळी गाडी भरलेली असते अथवा फलाटावरील प्रवाशी घेण्यासाठी लावली जाते. त्यावेळी जाणिवपूर्वक ड्रायव्हरकडून गाडीवर फलक लावले जात नाहीत हा चुकीचा प्रकार आहे.याबाबत अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज आहे.
- संतोष शिंदे,
प्रवासी , वेळू ता. कोरेगाव

Web Title: Yograj criticized Dhoni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.