शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

यवतेश्वर घाट : रस्ता खचला; कठड्यांचा कडेलोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 12:18 PM

पावसाला सुरुवात झाली नाही तोच दरड कोसळण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटात काही महिन्यांपूर्वीच सिमेंटचे संरक्षक कठडे उभारण्यात आले. परंतु घाटरस्ता खचत असल्याने कठड्यांचाच कडेलोट झाला. त्यामुळे यवतेश्वर घाटातून जाताय.. तर सावधान असं म्हणण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देयवतेश्वर घाट : रस्ता खचला; कठड्यांचा कडेलोटकाही दिवसांपूर्वीच बनविलेले संरक्षक कठडे ढासळले; वाहतुकीला धोका

सातारा : पावसाला सुरुवात झाली नाही तोच दरड कोसळण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. सातारा-कास मार्गावर असलेल्या यवतेश्वर घाटात काही महिन्यांपूर्वीच सिमेंटचे संरक्षक कठडे उभारण्यात आले. परंतु घाटरस्ता खचत असल्याने कठड्यांचाच कडेलोट झाला. त्यामुळे यवतेश्वर घाटातून जाताय.. तर सावधान असं म्हणण्याची वेळ आली आहे.पावसाला सुरुवात झाली की यवतेश्वर घाट ढगात हरवून जातो. चिंब भिजत निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तरुण-तरुणींची पावले या घाटाकडे वळायला लागतात. जागतिक वारसास्थळाच्या यादीत कास पुष्प पठाराचा समावेश झाल्यानंतर दरवर्षी लाखो पर्यटक पुष्पपठाराला भेट देतात. त्यामुळे सातारा-कास मार्गावरील यवतेश्वर घाटात वाहतुकीचा मोठा ताण असतो.साताऱ्यापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या यवतेश्वर घाटात सिमेंटपासून संरक्षक कठडे उभारण्यात आले आहेत. सर्वसाधारणपणे दोन फूट रुंद आणि पाच फूट लांबीच्या कठड्यांमुळे वाहतूक सुरक्षित होईल, अशी अपेक्षा होती. परंतु घाटरस्ता खचल्याने तेथील संपूर्ण कठडा दरीत कोसळला आहे. याच घाटात रविवारी झालेल्या पावसामुळे दरड कोसळली होती. त्यातच जमीन खचण्याचे प्रकारही समोर येत असल्याने या रस्त्याची पाहणी करून धोकादायक ठिकाणी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.गतवर्षी बांधकाम विभागाकडून घाटातील नादुरुस्त कठड्यांची कामे मोठ्या स्वरुपात करण्यात आली; परंतु अजूनही बहुतांशी ठिकाणची परिस्थिती जैसे थेच आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या दुतर्फा रिफ्लेक्टर तसेच दिशादर्शक फलक बसविणे गरजेचे बनले आहे. बांधकाम विभागाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.सुरक्षेसाठी लावले रस्त्याकडेला पिंपयवतेश्वर घाटात ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे, त्या ठिकाणी धोका दर्शविण्यासाठी चक्क पिंंप लावण्यात आले आहेत. घाटातून साताऱ्याकडे येताना तीव्र उतार आहे. त्यामुळे अनेक वाहनधारक गाडी बंद करून वेगाने साताऱ्याकडे येतात. बंद स्थितीतील सुसाट वाहनचालकांना हा धोका लक्षात येत नाही, त्यामुळे मोठा अनर्थ घडू शकतो.घाटामध्येच फोटोसेशनएका बाजूने रस्त्यालगत कोसळणारी दरड तर दुसरीकडे नादुरुस्त व तुटलेले संरक्षक कठडे यामुळे एकीकडे आड तर दुसरीकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे अकस्मात दरडी कोसळण्याची शक्यता अधिक असताना अनेक वाहनधारक आपली वाहने घाटात थांबवून फोटोसेशन करताना दिसून येत आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSatara areaसातारा परिसर