शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

यशवंतराव-प्रेमलाकाकींनी रोखला जनता पक्षाचा वारू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:46 IST

आ णीबाणीनंतरच्या काळानंतर १९७७ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, तत्कालीन मंत्री संजय गांधी यांना पराभवाला सामोरे ...

आ णीबाणीनंतरच्या काळानंतर १९७७ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, तत्कालीन मंत्री संजय गांधी यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. जनता पक्षाचा उधळलेल्या वारुने देशभर काँगे्रसला जोरदार धक्के दिले; परंतु सातारा व कºहाड लोकसभा मतदारसंघ मात्र त्याला अपवाद ठरले. सातारा लोकसभा मतदारसंघात दिवंगत यशवंतराव चव्हाण व कºहाड लोकसभा मतदारसंघात दिवंगत प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे या दोन्ही मतदारसंघांत जनता पक्षाला शिरकाव करता आला नाही.१९७५ ची देशभर लागू करण्यात आलेली आणीबाणी काँगे्रसला भलतीच महागात पडली. आणीबाणीच्या काळात जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली अनेक चळवळी झाल्या. याला मोठा लोकसहभाग मिळाला. आणीबाणीविरोधात ज्या पद्धतीने लोक एकत्र आले, त्याच पद्धतीने सातारा व कºहाड मतदारसंघांतही आणीबाणीच्या विरोधात आंदोलने झाली. इंदिरा गांधींच्या विरोधात जनमत उसळून आले होते. मात्र, त्याची राजकीय झळ कुठल्याही पद्धतीने जिल्ह्याच्या राजकारणात अग्रेसर असणाऱ्या काँगे्रस पक्षाला बसली नाही.जयप्रकाश नारायण, चरणसिंग यांच्या नेतृत्वाला देशभर पाठबळ मिळाले. सातारा जिल्ह्यातही त्याला प्रतिसाद मिळाला. मात्र, त्याचे रुपांतर निवडणुकीत विजय मिळविण्यात झाले नाही. दोन वर्षांनंतरच म्हणजे १९७७ मध्ये देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या. या निवडणुकीत इंदिरा गांधींना टक्कर देण्यासाठी विरोधकांनी एकत्रित येऊन जनता पक्षाची निर्मिती केली. या निवडणुकीत काँगे्रसचे साताऱ्यातील दोन्ही गड अभेद्य ठरले.१९७७ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सातारा मतदारसंघातून काँगे्रसने यशवंतराव चव्हाण यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. जनता पक्षाने त्यांच्याविरोधात सुशिक्षित उमेदवार डॉ. नितीन लवंगारे यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्याव्यतिरिक्त आणखी दोघांनी उमेदवारी केली होती. डॉ. लवंगारे हे सुशिक्षित उमेदवार असल्याने तसेच देशभर उसळलेल्या काँगे्रसविरोधी लाटेमुळे यशवंतराव चव्हाण यांचा पराभव होणार, असा प्रचार त्या काळात केला गेला. विरोधकांनी ताकद लावूनही यशवंतराव चव्हाण यांची लोकप्रियता कमी झाली नाही. या निवडणुकीत यशवंतराव चव्हाण २ लाख ६0 हजार ५६२ मते मिळवून विजयी झाले. तर डॉ. लवंगारे यांना ६८ हजार ९६१ मते मिळाली. इतर दोन उमेदवारांना तीन आकडी मतदानात समाधान मानावे लागले.कºहाड लोकसभा मतदारसंघात काँगे्रसने प्रेमलाकाकी चव्हाण यांनाच उमेदवारी दिली. या मतदासंघात जनता पक्षाला उमेदवारही मिळाला नाही. काँगे्रसचा परंपरागत विरोधी शेतकरी कामगार पक्षातर्फे बी. बी. देसाई यांना उमेदवारी दिली. अन्य दोन अपक्ष उमेदवारांनीही या निवडणुकीत नशीब आजमावले. या निवडणुकीत प्रेमलाकाकींना २ लाख ४२ हजार ३0५ मते मिळाली. तर बी. बी. देसाई यांना ७२ हजार ४९0 मते मिळाली. शेकापला या निवडणुकीतही विजय मिळवता आला नाही.दरम्यान, देशभर काँगे्रसविरोधकांनी जोरदार वातावरणनिर्मिती केली असताना सातारा व कºहाड लोकसभा मतदारसंघात काँगे्रस अभेद्य राहिली. प्रत्यक्ष इंदिरा गांधींनाही पराभवाला सामोरे जावे लागले असताना यशवंतरावांची लोकप्रियता दुपटीने वाढली.- सागर गुजर