कोरोना संकटात यशवंत बँकेचे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:39 IST2021-05-12T04:39:47+5:302021-05-12T04:39:47+5:30
पत्रकात म्हटले आहे की,सातारा येथील भारत डिस्ट्रिब्युटर व सांगली येथील टेक्नोएअर इक्विपमेंट्स या उद्योजकांना त्यांच्या प्लांटची क्षमता वाढवून हॉस्पिटलसाठी ...

कोरोना संकटात यशवंत बँकेचे योगदान
पत्रकात म्हटले आहे की,सातारा येथील भारत डिस्ट्रिब्युटर व सांगली येथील टेक्नोएअर इक्विपमेंट्स या उद्योजकांना त्यांच्या प्लांटची क्षमता वाढवून हॉस्पिटलसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन पुरवठा करण्याचा आग्रह आम्ही केला. यासाठी त्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून वेळेत अर्थसहाय्य सुद्धा केले.
याचाच परिणाम म्हणून आज सातारा व सांगली या दोन्ही ठिकाणी हे प्लांट नियमितपणे पूर्ण क्षमतेने ऑक्सिजन निर्मिती व वितरणाचे काम करीत आहे. याचा लाभ अतिदक्षता विभागातील रुग्णांना होत आहे. योग्यवेळी केलेले अर्थसहाय्य रुग्णांना नवसंजीवनी ठरत आहे.
सातारा येथे दररोज ८०० लिटर तर सांगली येथे ४५० लिटर ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे. या उद्योगांमुळे ५० तरुणांना नव्याने रोजगार उपलब्ध झाला आहे.बँकेच्या संचालक मंडळाने कोरोनाचे संकट ओळखून अशा उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले. मेक इन इंडिया, स्टार्टअप तसेच आत्मनिर्भर भारत या शासनाच्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी उद्योजकांना सहकार्य करण्याच्या दृष्टीने बँकेने हे पाऊल टाकले आहे.