म्हसवड येथील जिल्हास्तरीय प्राथमिक शाळेतील क्रीडा शिक्षकांसाठी कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:45 AM2021-09-24T04:45:32+5:302021-09-24T04:45:32+5:30

म्हसवड : माणदेशी फाऊंडेशन संचलित माणदेशी चॅम्पियन व अपवर्क फाऊंडेशन आणि सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसवड येथे ...

Workshop for Sports Teachers of District Level Primary School at Mhaswad | म्हसवड येथील जिल्हास्तरीय प्राथमिक शाळेतील क्रीडा शिक्षकांसाठी कार्यशाळा

म्हसवड येथील जिल्हास्तरीय प्राथमिक शाळेतील क्रीडा शिक्षकांसाठी कार्यशाळा

googlenewsNext

म्हसवड : माणदेशी फाऊंडेशन संचलित माणदेशी चॅम्पियन व अपवर्क फाऊंडेशन आणि सातारा जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसवड येथे पाचदिवसीय क्रीडा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा २० सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२१ या कालावधीत सारजाई मंगल कार्यालय, म्हसवड येथे होत आहे.

या कार्यशाळेत सहभागी क्रीडा शिक्षकांना आपल्या शाळेतील मुलांना खेळाच्या प्रशिक्षणाव्यतिरिक्त त्यांचा आहार कसा असावा, व्यायाम कोणता घ्यावा, शरिराला विश्रांती केव्हा द्यावी तसेच शारीरिक समतोल कसा साधावा, याबद्दलचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच विविध खेळांच्या माध्यमातून त्यातील बारकावे शिकवले जाणार आहेत. यामध्ये पहिल्या दिवशी कुस्तीचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. दुसऱ्या दिवशी फिटनेस व जीम ट्रेनिंगचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. तिसऱ्या दिवशी रनिंग, न्यूट्रेशन, कब्बडी याबद्दलचे प्रशिक्षण व मैदानावर प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. चौथ्या दिवशी स्पोर्टस् सायकॉलॉजी, ट्रेकिंग व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत तर पाचव्या दिवशी योगा, प्रेझेंटेशन, कौशल्य विकास मूल्यांकन व बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यावेळी बोलताना म्हणाले की, माणदेशी फाऊंडेशन व जिल्हा परिषद, सातारा यांचा हा पहिलाच क्रीडा प्रशिक्षण वर्ग असून, आगामी काळामध्ये आणखी अशाच कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये खेळभावना वाढवून उत्तम दर्जाचे खेळाडू तयार होण्यास मदत होईल. या कार्यशाळेला दुसऱ्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी शेखर सिंह अणि प्रभात सिन्हा यांनी सरावावेळी धावती भेट दिली.

या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, माणदेशी फाऊंडेशन व बँकेच्या अध्यक्ष चेतना सिन्हा, माणदेशी चॅम्पियनचे अध्यक्ष प्रभात सिन्हा, म्हसवड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा (भाऊ), महिला बालकल्याण सभापती सोनलताई पोळ, शिक्षणाधिकारी देशमाने तसेच माणदेशी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी, शिक्षण विभागाचे पदाधिकारी व माणदेशीचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत झाले.

फोटो मेलवर पाठवत आहे.

Web Title: Workshop for Sports Teachers of District Level Primary School at Mhaswad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.