जिहे कटापूर बोगद्यात काम करताना कामगार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:24 IST2021-07-03T04:24:18+5:302021-07-03T04:24:18+5:30

सातारा : जिहे कटापूर पाणी योजनेच्या बोगद्यात काम करत असताना शिडीला लागलेल्या ग्रीसवरून पाय घसरून पडल्याने कामगार ठार झाला. ...

Workers killed while working in Jihe Katapur tunnel | जिहे कटापूर बोगद्यात काम करताना कामगार ठार

जिहे कटापूर बोगद्यात काम करताना कामगार ठार

सातारा : जिहे कटापूर पाणी योजनेच्या बोगद्यात काम करत असताना शिडीला लागलेल्या ग्रीसवरून पाय घसरून पडल्याने कामगार ठार झाला. मनोजकुमार महादेव महतो (वय २८, रा. झारखंड) असे या कामगाराचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खटाव तालुक्यातील नेर-फडतरवाडी ते माण तालुक्यातील मलवडी मार्गावर जिहे कटापूर पाणी योजनेच्या बोगद्याचे काम सुरू आहे. या बोगद्यात काम करत असताना कामगार मनोजकुमार महादेव महतो हा शिडीवर चढून प्लटफॉर्मवर काम करत होता. दरम्यान शिडीला लागलेल्या ग्रीसवरून घसरून महतो बोगद्यातील खड्ड्यात पडला. तसेच दगड लागल्याने जखमी झाला. ठेकेदार व इतर कामगारांनी त्याला तातडीने पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी हवालदार माने हे अधिक तपास करीत आहेत.

......................................................

Web Title: Workers killed while working in Jihe Katapur tunnel