सॅनिटायझर स्टँँडने कामगाराला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST2021-06-27T04:25:40+5:302021-06-27T04:25:40+5:30
सातारा : जेवण करत असताना झालेल्या किरकोळ कारणावरुन चिडून एकाच्या डोक्यात सॅनिटायझर स्टँड घालून त्याला जखमी केल्याप्रकरणी सातारा शहर ...

सॅनिटायझर स्टँँडने कामगाराला मारहाण
सातारा : जेवण करत असताना झालेल्या किरकोळ कारणावरुन चिडून एकाच्या डोक्यात सॅनिटायझर स्टँड घालून त्याला जखमी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. योगेश उत्तम महाडिक (वय ४२, रा. आरे, ता. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, सातारा येथील जुन्या एमआयडीसीमध्ये असणाऱ्या नवकार ऑक्सिन कॉर्पोरेशन कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराशेजारी असलेल्या नळाजवळ कंपनीतील कामगार तानाजी लक्ष्मण जाधव (वय ४३, रा. गेंडामाळ, शाहूपुरी, सातारा) आणि योगेश उत्तम महाडिक हे दोघे जेवत होते. यावेळी दोघांचीही किरकोळ कारणावरुन भांडणे झाले. याचा राग मनात धरुन योगेश याने तानाजी यांच्या डोक्यात सॅनिटायझर स्टँड मारले. यात जाधव हे जखमी झाले. यावेळी योगेशने शिवीगाळही केली. तानाजी जाधव हे जखमी झाले असून, याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक सुतार करत आहेत.