शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरातील युनिक उड्डाणपुलाच्या काम रेंगाळले; पगार नसल्याने सब कॉन्ट्रॅक्टरसह काही ऑपरेटर व लेबर गायब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 18:02 IST

माणिक डोंगरे  मलकापूर : मलकापुरातील युनिक उड्डाणपुलाचे काम सध्या संत गतीने सुरू आहे. वेळेत आर्थिक पूर्तता होत नसल्याने तीन  ते ...

माणिक डोंगरे मलकापूर : मलकापुरातील युनिक उड्डाणपुलाचे काम सध्या संत गतीने सुरू आहे. वेळेत आर्थिक पूर्तता होत नसल्याने तीन  ते सहा महिन्यापर्यंत काहीजणांना पगार मिळत नसल्यामुळे सब कॉन्ट्रॅक्टर्स, ऑपरेटर व काही प्रमाणात लेबरही गायब झाले आहे. त्यामुळे पुलाच्या कामाला गेली दोन महिन्यापासून चांगलाच ब्रेक लागला असून याची स्थानिक लोकप्रतिनिधींनी दखल घेणे गरजेचे आहे.पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या शेंद्रे ते कागल या सुमारे दिडशे किलोमीटर पट्ट्याच्या सहापदरीकरणाच्या प्रस्तावाचे महाराष्ट्र राज्य रस्ते  विकास महामंडळाने सर्वेक्षण करून अंतीम मास्टर प्लॅन तयार केला होता. त्यामधील शेंद्रे ते पेठनाका एकूण ६७ किलोमीटर या पट्ट्यातील सहापदरीच्या कामांना एक वर्षापूर्वी सुरवातही केली आहे. सहपदरीकरणात मलकापूर जंक्शन येथे २९.५ मीटर रुंदीचा ५.५ मीटर उंचीचा सिंगल पिलरवर आधारित ३.४७ किमी लांबीचा पंकज हॉटेल ते ग्रीन लँड हॉटेल पर्यंत ग्रेड सेप्रेटरसह उड्डाणपूल होणार आहे. काम सुरू झाल्यापासून पहिल्या सहा महिन्यात जुने उड्डानपूल पाडून नव्या पुलाच्या कामास सुरवात केली होती. या उड्डानपूलाच्या सर्वच ९२ पिलरचे कास्टिंग पूर्ण झाले आहे. तर सर्व ९२ पिलर कॕपसह उभे राहिले आहे. अत्याधुनिक  दोन गरडर मशिनद्वारे सिगमेंट बसवून पुलाचे एका ठिकाणी ३३ तर दुसऱ्या ठिकाणी २९ असे ६२ गाळे तयार झाले आहेत. कामाची सध्याची गती विचरात घेता उड्डाणपुलाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र गेले महिनाभरापासून पुलाचे काम पूर्वीच्या गतीने होत नसल्याचे दिसून आले. याबाबत अधिकृत सूत्रांकडे चौकशी केली असता, काही विभागातील सुपरवायझर,ऑपरेटर व लेबरचे पगार तीन महिन्यापासून ते सहा महिन्यापर्यंत दिलेले नसल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.  त्यामुळे या पट्ट्यात काम करणाऱ्या सब कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखालील ऑपरेटर, सुपरवायझर व काही लेबर गायब झाले आहेत़. तर काही कामगार बुक्क्याचा मार सहन करून काम करत असल्याचे बोलले जात आहे. शहरातील या महत्त्वाच्या कामात होत असलेली दिरंगाई विचारात घेता, स्थानिक खासदार, आमदार व  लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

मुंबई -गोवा महामार्गाच्या कामाची पुनरावृत्तीची शक्यताआहे तेवढ्या अपुऱ्या कर्मचाऱ्यावर सध्या काम सुरू असून, मलकापुरातील गर्दीच्या ठिकाणी असलेल्या उड्डाणपुलासह महामार्गाच्या कामात दिरंगाई होत आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या रेंगाळलेल्या कामाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.                          

एकूण पिलर ९२, कास्टिंग झलेले ९२, पिलर कॅप तयार झालेले ९२, सिगमेंट बसवून झालेले गाळे ६२, सिगमेंट बसवण्याचे बाकी ३० गाळे,

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhighwayमहामार्ग