म्हासुर्णे व्यापारी संकुलनाचे कामकाज आदर्शवत : बाळासाहेब पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:24 IST2021-09-02T05:24:22+5:302021-09-02T05:24:22+5:30

पुसेसावळी : ‘म्हासुर्णे ग्रामपंचायतीच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलनामुळे गावाच्या विकासात भर पडणार असून, व्यापारीदृष्ट्या या परिसरास महत्त्व प्राप्त होणार ...

The work of Mhasurne Merchant Complex is ideally: Balasaheb Patil | म्हासुर्णे व्यापारी संकुलनाचे कामकाज आदर्शवत : बाळासाहेब पाटील

म्हासुर्णे व्यापारी संकुलनाचे कामकाज आदर्शवत : बाळासाहेब पाटील

पुसेसावळी : ‘म्हासुर्णे ग्रामपंचायतीच्यावतीने बांधण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलनामुळे गावाच्या विकासात भर पडणार असून, व्यापारीदृष्ट्या या परिसरास महत्त्व प्राप्त होणार आहे. तरी विविध अद्ययावत विकासकामांच्याबाबतीत ग्रामपंचायतीचे कामकाज आदर्शवत चालले आहे,’ असे मत बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.

म्हासुर्णे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या व्यापारी संकुलनाच्या व विविध विकासकामांच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, इंदिरा घार्गे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, सहायक निबंधक विजया बाबर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत, सदस्य सुरेंद्र गुदगे, माजी सभापती मानसिंग माळवे, नियोजन मंडळ सदस्य नंदकुमार मोरे, पंचायत समिती सभापती जयश्री कदम, संतोष घार्गे, रेखा घार्गे, सी. एम. पाटील, मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज, श्रीकांत पिसाळ, धोंडिराम जगताप, अरुण दबडे, दाऊत पटेल, प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, इंदिरा घार्गे, सुनील माने, नंकुमार मोरे आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमास सरपंच सचिन माने, उपसरपंच विठ्ठल माने, महादेव माने, ग्रामपंचायत सदस्य तुषार माने, सिकंदर मुल्ला, आबा यमगर, गुलाब वायदंडे, सुहास माने, नलिनी कुलकर्णी, कुसुम माने, आण्णासोा माने, दिव्या पवार, प्रियांका माने, राजाराम माने, विलास शिंदे, दादासोा कदम आदी उपस्थित होते.

Web Title: The work of Mhasurne Merchant Complex is ideally: Balasaheb Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.