महिलांना संधी उपाध्यक्षपदापर्यंतच !--सांगा... डीसीसी कुणाची?

By Admin | Updated: April 3, 2015 23:57 IST2015-04-03T22:39:15+5:302015-04-03T23:57:08+5:30

१९४९ मध्ये स्थापन झालेल्या जिल्हा बँकेत १९९३ मध्ये घटनादुरुस्ती होऊन महिलांना राखीव गटातून संधी मिळाली.

Women's Opportunity to be Vice-President! - Tell ... Who is the DCC? | महिलांना संधी उपाध्यक्षपदापर्यंतच !--सांगा... डीसीसी कुणाची?

महिलांना संधी उपाध्यक्षपदापर्यंतच !--सांगा... डीसीसी कुणाची?

दत्ता पवार - कुडाळ  जिल्हा बँकेने आदर्श कामकाजाद्वारे सहकार क्षेत्रात वेगळा ठसा उमटविलेला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेत संचालक म्हणून संधी मिळण्यासाठी नेहमीच रस्सीखेच पाहायला मिळाली आहे. १९४९ मध्ये स्थापन झालेल्या जिल्हा बँकेत १९९३ मध्ये घटनादुरुस्ती होऊन महिलांना राखीव गटातून संधी मिळाली.
माजी आमदार शालिनीताई पाटील, आशालता कदम, सुनेत्रा शिंदे, मंगल पवार अशा अनेक संधी मिळाल्याने महिला संचालकांनी उठावदर्शक कामगिरी केली; परंतु अध्यक्षपदावर एकाही महिलेला अद्याप संधी मिळालेली नाही. मात्र, दया गजानन बगाडे यांनी उपाध्यक्षपदापर्यंत मजल मारली.
बँकेने विविध पुरस्कार मिळवून नावलौकिक वाढविला आहे. १९९६ च्या घटनादुरुस्तीनुसार जिल्हा बँकेत महिलांना विशेष प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार महिला राखीव गट निर्माण झाला. १९९३ ते २००२ संचालक मंडळात दया गजानन बगाडे (कोरेगाव), कलावती देशमुख (पाटण), मालनताई जगताप (भणंग) यांचा समावेश होऊन महिला प्रतिनिधींचा जिल्हा बँकेत प्रवेश झाला. तर दया बगाडे यांना १९९४-९६ या काळात बँकेच्या उपाध्यक्ष म्हणून संधी मिळाली. त्यांच्यानंतर जिल्हा बँकेत एकाही महिला संचालकाला अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. संचालक म्हणून काम करताना महिलांनी उठावदार काम करण्याचा प्रयत्न केला आहे.
आतापर्यंत २००२-०७ या कालावधीत संजीवनी देशमुख (खटाव), अशालता कदम (जावळी), २००७-१५ सुनेत्रा शिंदे (कुडाळ), मंगल पवार (पाटण) यांनी महिला राखीव गटातून प्रतिनिधित्व केले. महिला राखीव गट वगळता केवळ माजी आमदार शालिनीताई पाटील व दिवंगत राजेंद्र शिंदे यांच्यानंतर काही वर्षांसाठी सुनेत्रा शिंदे यांनीच सोसायटी गटातून प्रतिनिधित्व केले आहे.


जिल्हा परिषद अध्यक्ष स्वीकृत संचालकपद रद्द
जिल्हा बँकेत जिल्हा परिषद अध्यक्षांना स्वीकृत संचालक म्हणून संधी दिली जाते. त्यानुसार हेमलता ननावरे, गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, भाग्यश्री भाग्यवंत, ज्योती जाधव, अरुणादेवी पिसाळ या महिला जिल्हा परिषद अध्यक्षांना स्वीकृत संचालक म्हणून संधी मिळाली. मात्र, ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार जिल्हा परिषद अध्यक्ष स्वीकृत संचालकपद रद्द झाल्यामुळे यापुढे जिल्हा परिषद अध्यक्ष स्वीकृत संचालक म्हणून जाऊ शकणार नाही.
महिला संचालकसाठी जावळीला जास्तवेळा संधी
१९९३ मध्ये जिल्हा बँकेत महिला राखीव गट झाल्यानंतर बँकेत या गटातून आलेल्या महिला संचालकात जावळी तालुक्याला अधिक वेळा संधी मिळाली आहे. मालन जगताप, आशालता कदम, सुनेत्रा शिंदे यांचा संचालक मंडळात समावेश होता. तर आशालता कदम यांनी प्रस्थापितांविरोधी निवडणूक लढवून विजय मिळविला होता.

Web Title: Women's Opportunity to be Vice-President! - Tell ... Who is the DCC?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.