पार्ले येथे महिलांची शेतीशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:45 IST2021-09-23T04:45:07+5:302021-09-23T04:45:07+5:30

कोपर्डे हवेली : पार्ले, ता. कराड येथे राज्य कृषी विभागामार्फत सोयाबीन या पिकाची व ई - पीक पाहणी महिलांची ...

Women's farm at Parle | पार्ले येथे महिलांची शेतीशाळा

पार्ले येथे महिलांची शेतीशाळा

कोपर्डे हवेली : पार्ले, ता. कराड येथे राज्य कृषी विभागामार्फत सोयाबीन या पिकाची व ई - पीक पाहणी महिलांची शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती. कोल्हापूर कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरूदत्त काळे, उपविभागीय कृषी अधिकारी दौलतराव चव्हाण, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, सरपंच अश्विनी मदने, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश नलवडे, तंटामुक्ती अध्यक्ष गोरख नलवडे आदी यावेळी उपस्थित होते.

उमेश पाटील म्हणाले, महिलांनी एकत्रित येऊन एखादा प्रक्रिया उद्योग उभा करुन आर्थिक उन्नती साधावी. त्यासाठी अनुदान कसे प्राप्त होते, याविषयी मार्गदर्शन केले. गुरुदत्त काळे मार्गदर्शन करताना म्हणाले, बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी एकत्रित येऊन आपल्या कुटुंबाला हातभार लावण्याचे काम करावे, त्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या उद्योग उभारणीची माहिती दिली.

सैदापूरचे मंडल अधिकारी विनय कदम यांनी ई - पीक पाहणीबाबत मोबाईल ॲपचा वापर कशा पद्धतीने करावा, याविषयी मार्गदर्शन करुन प्रात्यक्षिक दाखवले.

यावेळी कृषी सहाय्यक मनीषा कुंभार, कृषी पर्यवेक्षक पी. व्ही. मोरे, नवनाथ मदने, एस. व्ही. चव्हाण, एस. एम. गायकवाड, बी. बी. माळी आदी उपस्थित होते.

यावेळी खरीप हंगामातील सोयाबीन या पिकांसाठी जमिनीची निवड, बियाण्यांची निवड प्रक्रिया, खत आणि कीड तसेच पाणी व्यवस्थापन आदींविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कृषी सहाय्यक मनीषा कुंभार यांनी प्रास्ताविक केले. विशाल जगदाळे यांनी आभार मानले.

Web Title: Women's farm at Parle