शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

आडव्या बाटलीसाठी महिलांचा एल्गार

By admin | Updated: May 2, 2017 23:54 IST

आडव्या बाटलीसाठी महिलांचा एल्गार

ग्रामसभांमध्ये ‘तुफान आलं या’ : भविष्यात कोणत्याही परिस्थितीत परवानगी न देण्याचा निर्धारसातारा : राष्ट्रीय व राज्य महामार्गापासून काही अंतरावर दारूविक्री करणारे दारू दुकान व बिअर बार बंद करण्याचा निर्धार राज्य शासनाने केला. त्यामुळे त्या दुकानदारांनी ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रित केले. पण वेळीच सावध होत गावोगावच्या महिलांनी महाराष्ट्र दिनी आयोजित ग्रामसभेत दारूच्या हद्दपारीचा निर्धार केला.दारूबंदीच्या चळवळीत सातारा जिल्हा कायमच अग्रेसर राहिला आहे. अनेक गावांमध्ये महिलांनी एकत्र येऊन मतदानाद्वारे बाटली आडवी केली. या चळवळीची राज्यभरात दखल घेतली गेली. त्यातून प्रेरणा घेऊन इतर जिल्ह्यातही दारूबंदीचा निर्धार करण्यात आला होता. राज्य व राष्ट्रीय महामार्गावर दारूविक्रीस बंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका सातारा जिल्ह्यातून गेलेल्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगतचे दारू, बिअर बार व परमिट रूमचालकांना बसला. त्यामुळे ते ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविण्याची शक्यता आहे. हे गृहीत धरून व्यसनमुक्त चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी १ मे महाराष्ट्र दिनी होणार असलेल्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करण्याचे आवाहन केले होते. त्याला अनेक गावांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. दारूबंदीचा ठराव केला. (प्रतिनिधी) वाठार स्टेशन : महाराष्ट्र दिन, कामगार दिनानिमित्त घेतलेल्या देऊरच्या ग्रामसभेत गावातून दारू कायमची हद्दपार होण्याबाबतचा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी कृषी मालास हमीभावाचा ठरावही संमत करण्यात आला. देऊरला ‘नो दारू’चा ठरावयावेळी गावच्या कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजनेबाबत गावानजीक असलेल्या तळहिरा पाझर तलावातून नवीन योजना मंजूर करण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मैदानाबाबत तसेच गावातील बंद पडलेल्या आणि दुरवस्था झालेल्या शासकीय विश्रामगृहाच्या दुरुस्तीबाबत पाठपुरावा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. उपसरपंच बाळासाहेब कदम, प्रदीप कदम, राजेंद्र कदम यांनी मनोगत व्यक्त केले. ग्रामसेवक राहुल कदम यांनी आभार मानले. दारूविरोधात वडूथला महिलांनी आवळली मूठशिवथर : सातारा तालुक्यातील वडूथ हद्दीत सर्व प्रकारच्या दारू विक्रीला कायमची बंदी करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव सोमवारच्या ग्रामसभेत करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी हात उंचावून ठराव मंजूर केला. वडूथमध्ये अनेक वर्षांपासून शासनमान्य देशी दारूचे दुकान सुरू होते. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. मात्र, दारू दुकान शासनमान्य असल्यामुळे कोणीच काही करत नव्हते. शासनाच्या नव्या नियमानुसार २२० मीटरच्या आत देशी-विदेशी दारू दुकान बंद करण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या ग्रामसभेत महिलांनी आक्रमक होऊन दारूबंदीचा ठराव आणला.