कऱ्हाडात महिला काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:25 IST2021-06-27T04:25:27+5:302021-06-27T04:25:27+5:30
कऱ्हाड : ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून संघटित, असंघटित महिला काँग्रेसच्यावतीने ...

कऱ्हाडात महिला काँग्रेसची निदर्शने
कऱ्हाड : ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून संघटित, असंघटित महिला काँग्रेसच्यावतीने कऱ्हाडात निदर्शने करण्यात आली. शाहू महाराज जयंतीनिमित्त शहरातील छत्रपती शाहू महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संघटित, असंघटित महिला काँग्रेसच्या प्रदेश समन्वयक ॲड. मनिषा रोटे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष वैशाली चौहान, सातारा शहराध्यक्ष मनिषा पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष प्रिया आलेकर, कोरेगाव तालुकाध्यक्ष मनिषा स्वामी, पाटण तालुकाध्यक्ष व सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त संघटित, असंघटित महिला काँग्रेसच्यावतीने शहरातील शाहू चौकात असणाऱ्या महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला यावेळी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला तसेच अभिवादन करून मोदी सरकारविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करून या समाजावर भाजप सरकारने अन्याय केला असल्याची भावना यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. भाजप सरकारविरोधात निदर्शने करतानाच महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
फोटो :
कॅप्शन : कऱ्हाडात संघटित, असंघटित महिला काँग्रेसच्यावतीने छत्रपती शाहू महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.