पर्यावरण संवर्धनाची महिलांनी घेतली शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:38 IST2021-03-21T04:38:43+5:302021-03-21T04:38:43+5:30
कोरोना महामारीवेळी स्वत:ची पर्वा न करता सर्वांची सेवा करणाऱ्या आशा सेविका, महिला कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी यांची ...

पर्यावरण संवर्धनाची महिलांनी घेतली शपथ
कोरोना महामारीवेळी स्वत:ची पर्वा न करता सर्वांची सेवा करणाऱ्या आशा सेविका, महिला कर्मचारी आणि महिला पोलीस कर्मचारी यांची जागतिक महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘माझी वसुंधरा’अंतर्गत मोफत फुलझाडे वाटप केले. या कार्यक्रमास नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, शिक्षण व नियोजन सभापती प्रशांत चांदे, महिला बालकल्याण सभापती शकुंतला शिंगण, उपसभापती स्वाती तुपे, नगरसेवक सागर जाधव, नगरसेविका कमलताई कुराडे, नंदाताई भोसले, गीतांजली पाटील, पूजा चव्हाण, विद्याताई थोरवडे, जयंत कुराडे, शहाजी पाटील, हणमंत शिंगण, मेडिकल असोसिएशनचे सागर पाटील यांच्यासह आशा सेविका, कर्मचारी आणि महिला उपस्थित होत्या.
फोटो : २०केआरडी०५
कॅप्शन : आगाशिवनगर (ता. कऱ्हाड) येथे मलकापूर पालिकेच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत महिलांना रोपांचे वाटप करण्यात आले. यावेळी पर्यावरण संवर्धनाची शपथही घेण्यात आली.