A woman stoned to death for jewelry | महिलेचा दागिन्यांसाठी दगडाने ठेचून खून,एकजण ताब्यात
महिलेचा दागिन्यांसाठी दगडाने ठेचून खून,एकजण ताब्यात

ठळक मुद्देमहिलेचा दागिन्यांसाठी दगडाने ठेचून खूनमाळवाडीतील घटनेने खळबळ : पोलिसांकडून तपास सुरू

मसूर /सातारा : शेतात काम करत असताना दगडाने ठेचून सुमन शंकर शेलार (वय ४५ रा.माळवाडी, ता. कऱ्हाड ) यांचा गुरुवारी भर दुपारी निर्घृण खून करण्यात आला होता. या खूनप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत.

माळवाडी, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीतील देशपांडे अकराव नावच्या आपल्या शिवारात सुमन शेलार या गुरुवारी दुपारी काम करत होत्या. त्यावेळी चोरीच्या उद्ेशाने अज्ञाताने त्यांचा दगडाने ठेचून खून केला होता. त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञाताने काढून घेतले होते.

त्यानंतर   हल्लेखोरांने मृतदेह फरफटत नेऊन झाडाला साडी व सुरुंगाच्या वायरने बांधून ठेवला होता. कऱ्हाड  पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून एका संशयिताला शुक्रवारी ताब्यात घेतले आहे. संबंधितांवर या खुनाचा संशय असून, त्यानेच हा खून केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे येत आहे.

शेतात काम करत असताना अज्ञाताने एका महिलेचा केवळ दागिन्यांच्या हव्यासापोटी दगडाने ठेचून निर्घृण खून केला. ही खळबळजनक घटना कऱ्हाड तालुक्यातील माळवाडी येथे गुरुवारी भरदुपारी तीनच्या सुमारास घडली.
सुमन शंकर शेलार (वय ४५ रा.माळवाडी, ता. कऱ्हाड ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

माळवाडी गावच्या हद्दीतील देशपांडे अकराव नावच्या आपल्या शिवारात सुमन शेलार या काम करत होत्या. त्यावेळी चोरीच्या उद्ेशाने संबंधिताने त्यांचा दगडाने ठेचून खून केला. त्यांच्या गळ्यातील गळ्यातील सोन्याचे दागिने अज्ञाताने काढून घेतले. त्यानंतर हल्लेखोरांने मृतदेह फरफटत नेऊन ओढ्यातील पाण्यात झाडाला साडी व सुरुंगाच्या वायरने बांधून ठेवला.

त्यानंतर संबंधिताने तेथून पलायन केले. बराचवेळ झाला तरी त्या घरी आल्या नाहीत म्हणून त्यांच्या मोबाईलवर घरातल्यांनी फोन केला. मात्र, फोन बंद होता. त्यामुळे घरातले लोक शेतात गेले असता हा प्रकार उघड झाला.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांनी भेट देऊन तपासाबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. 

कर्णफुलांसाठी कानही तोडले...

हल्लेखोराने सुमन शेलार यांच्या दोन्ही कानातील दागिने काढण्याच्या हेतूने दगडाने ठेचून दोन्ही कान तोडले. परंतु कानातले दागिने सोन्याचे नसल्याचे लक्षात येताच कानातील बनावट दागिने त्याठिकाणी टाकले. घटनास्थळी रक्ताने माखलेला दगड सापडला. तसेच पिशवी, मोबाईल बॅटरी, सिमकार्ड कार्डही सापडले आहे.
 

Web Title: A woman stoned to death for jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.