शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कार अपघातात महिला ठार, पाच जण जखमी; गुरु पौर्णिमेनिमित्त देवदर्शन करुन परतताना घडली दुर्दैवी घटना

By दीपक शिंदे | Updated: July 22, 2024 12:05 IST

कऱ्हाड (जि. सातारा) : देवदर्शनाहून परतताना चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार रस्त्याकडेच्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात एक महिला ठार, ...

कऱ्हाड (जि. सातारा) : देवदर्शनाहून परतताना चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार रस्त्याकडेच्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात एक महिला ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले. शेडगेवाडी ते कऱ्हाड मार्गावर ओंड, ता. कऱ्हाड गावच्या हद्दीत सोमवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.जयश्री संतोष मोरे (वय ४२, रा. होम समर्थ सोसायटी, सानपाडा, सेक्टर ५, नवी मुंबई) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे, तर संतोष शंकर मोरे (रा. सानपाडा, सेक्टर ५, नवी मुंबई), विकास वसंत भोसले (रा. भांडुप, मुंबई), शैला संजय कदम, माधुरी लोंढे (दोघीही रा. कुर्ला, मुंबई) व गिरीश सूर्यकांत गुहागरकर (रा. विक्रोळी, मुंबई) हे जखमी झाले आहेत.नवी मुंबई येथील संतोष मोरे हे पत्नी जयश्री यांच्यासह इतरांसोबत कारने गुरुपौर्णिमेनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील नाणीज येथे देवदर्शनासाठी गेले होते. तेथील कार्यक्रम झाल्यानंतर ते सर्व जण रात्री पुन्हा मुंबईला जाण्यासाठी शेडगेवाडी ते कऱ्हाड मार्गाने कऱ्हाडकडे येत होते. गिरीश गुहागरकर हा कार चालवीत होता.सोमवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ओंड गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे कार रस्त्याच्या उजव्या बाजूस जाऊन रस्त्यानजीकच्या खड्ड्यात पलटी झाली. त्यामध्ये सर्वजण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच जयश्री मोरे यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरAccidentअपघातDeathमृत्यू