दुचाकीच्या धडकेत महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:38 IST2021-04-06T04:38:25+5:302021-04-06T04:38:25+5:30
सातारा : येथील मोळाचा ओढा परिसरात असणाऱ्या बुधवार नाक्यावर एका दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी झाली. याप्रकरणी ...

दुचाकीच्या धडकेत महिला जखमी
सातारा : येथील मोळाचा ओढा परिसरात असणाऱ्या बुधवार नाक्यावर एका दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी झाली. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात साई रतन भिसे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शालन अशोक चव्हाण (वय ४०, रा. माजगावकर माळ, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्या सासू किसाबाई तात्या चव्हाण या पायी चालत निघाल्या होत्या. यावेळी त्यांना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या साई रतन भिसे (रा. कमानी हौद, सातारा) या दुचाकीस्वाराने (एमएच ११- सी ६२१३) जोरदार धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. ही घटना दि. ३१ मार्चला घडली असून, याप्रकरणी शालन चव्हाण यांनी दि. ४ एप्रिलला शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर साई भिसे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार गायकवाड हे अधिक तपास करत आहेत.