ग्रामपंचायत लढविणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 15:58 IST2021-01-07T15:56:58+5:302021-01-07T15:58:20+5:30
Grampanchyat Satara- फलटण तालुक्यात ८० ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा सुरू असून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना सभा,दौरे कार्यक्रमासाठी लागणाऱ्या विविध परवानगीसाठी तहसीलदार कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार आर. सी. पाटील यांनी दिली.

ग्रामपंचायत लढविणाऱ्या उमेदवारांच्या सोयीसाठी एक खिडकी योजना
फलटण : फलटण तालुक्यात ८० ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा सुरू असून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना सभा,दौरे कार्यक्रमासाठी लागणाऱ्या विविध परवानगीसाठी तहसीलदार कार्यालयात एक खिडकी योजना सुरू करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदार आर. सी. पाटील यांनी दिली.
सध्या फलटण तालुक्यातील ८० ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यास उभे राहिलेल्या उमेदवारांची गैरसोय होऊ नये म्हणून ग्रामपंचायत निवडणूकीसाठी लागणाऱ्या परवानगीसाठी एक खिडकी योजना तहसील कार्यालय येथील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या शाखेमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे, अशी माहिती फलटणचे निवासी नायब तहसीलदार रमेश पाटील यांनी दिली.