शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

'...त्यांना ६ महिन्यांत जागा दाखवू'; प्रीतीसंगमावरून शरद पवारांचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 06:02 IST

महाराष्ट्राला पुन्हा प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी आता नवीन पिढी तयार करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

- दीपक शिंदे कऱ्हाड (जि. सातारा) : ‘देशातील सर्वसामान्यांचा लोकशाहीचा अधिकार काढून घेणे आणि जातीय दंगली घडविण्याचे काम सुरू आहे. राज्यातही अशाच प्रकारची यंत्रणा कार्यरत आहे. त्यांना पुढील सहा महिन्यांत येणाऱ्या निवडणुकीत जागा दाखवू,’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

महाराष्ट्राला पुन्हा प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी आता नवीन पिढी तयार करणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. कऱ्हाड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला सोमवारी अभिवादन करून पवार यांनी राष्ट्रवादीची नवी भूमिका स्पष्ट केली. यावेळी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसह युवा नेते रोहित पवार, रोहित पाटील आणि प्रतीक पाटील हेही उपस्थित होते.   

सोबत कोण होते?कऱ्हाड येथील प्रीतिसंगमावरील यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळावर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिवादन केले. यावेळी हजारो समर्थकांसह आमदार शशिकांत शिंदे, दीपक पवार, आमदार बाळासाहेब पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, अनिल देशमुख आदी उपस्थित होते. 

आता फक्त माझाच आवाज... प्रीतीसंगमावरती कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शरद पवार यांचा जयघोष केला जात होता. यावेळी पवारांनी सर्वांना शांत करत, शांत बसा, कोणी बोलू नका. आता फक्त माझाच आवाज, असे बोलल्याने सर्वत्र शांतता पसरली. मात्र, त्यातून त्यांना नेमका काय संदेश द्यायचा आहे, हेदेखील सर्वांना कळले.

यशवंतराव चव्हाण हे तुमचे, आमचे सर्वांचे गुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात जनमत तयार करण्याचे काम पुढच्या काळात करायचे आहे. ते त्यांचा आशीर्वाद घेऊनच करणार आहोत. यासाठी त्यांना वंदन करून महाराष्ट्राच्या नवीन कामाला सुरुवात करीत आहे. - शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष