शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Satara: भिंतीवर डोके आपटून पत्नीचा खून, मारून झोपल्याचे भासवले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 12:30 IST

चारित्र्याच्या संशयावरून दारूच्या नशेत केला खून

म्हसवड : चारित्र्याच्या संशयावरून दारूच्या नशेत पत्नीचे डोके भिंतीवर आपटून खून करण्यात आला. ही घटना म्हसवड येथे रविवारी घडली. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पतीला अटक केली आहे. दीपाली धोंडिराम पुकळे (वय २९) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, दीपाली धोंडीराम पुकळे (रा. कोडलकरवाडी, म्हसवड) हिचा विवाह धोंडीराम पुकळे (वय ४०, पुकळेवाडी, ता. माण) याच्याबरोबर झाला होता. धोंडीराम व पत्नी दीपाली हे म्हसवड येथील सहकारनगर परिसरात एका इमारतीत खोली भाड्याने घेऊन राहत होते. दीपाली ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. दीपाली व धोंडीराम यांना ८ व ९ वर्षांची अशी दोन मुले आहेत. धोंडिराम शनिवारी रात्री दारू पिऊन आला. दीपाली हिच्या चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणात धोंडीराम याने दीपालीचे डोके भिंतीवर व जमिनीवर आपटले. यामध्ये दीपालीच्या कानातून व नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला. त्यानंतर तिला बेडवर झोपवले. मुलांना जवळ घेऊन मुले झोपवली.धोंडिराम स्वत:ही रात्रभर दीपालीजवळ बसून होता. सकाळी मुले उठल्यानंतर धोंडीरामनेच चहा-बिस्किटे दिली. मुले आईला उठवत असताना रोज भांडणे झाल्यावर रागा रागाने आई झोपते त्याप्रमाणे झोपली असेल असे मुलांना वाटले. त्यानंतर अकराच्या सुमारास मुलांना बाहेर खेळाला पाठविले. धोंडिरामही दुपारी दोनच्या दरम्यान घराबाहेर गेला.त्यावेळी घरी आलेल्या मुलांनी आईला उठवण्याचा प्रयत्न केला; मात्र आई उठत नाही म्हणून रडू लागली. यामुळे शेजारी राहणारे लोक तेथे आले. त्यांनी पाहिले तर दीपालीचा श्वास बंद पडला होता. याबाबत कोडलकरवाडीच्या तिच्या आई-वडिलांना माहिती देताच ते घटनास्थळी आले. त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.दरम्यान, खुनानंतर धोंडिराम हा खून करून एका ठिकाणी दडून बसला होता. पोलिसांनी शिताफीने धोंडीरामला पत्नी दीपाली हिचा खून केल्याप्रकरणी ताब्यात घेतले. उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस