शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
2
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
3
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
5
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
6
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
7
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
8
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
9
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
10
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
11
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
12
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
13
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
14
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
15
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
16
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
17
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
18
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
19
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
20
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Satara Politics: फलटणमध्ये कोण मस्ती करतोय, त्याचा आवाज बंद करतो; एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 13:00 IST

Local Body Election: ‘शेर कभी बुढा नही होता’..., मुलासाठी प्रोटोकॉल सोडून ‘रामराजे’ आले व्यासपीठावर

फलटण : ‘एक सुरक्षित आणि सुंदर फलटण आपल्याला करायचं आहे. फलटणला जगाच्या नकाशावर स्थान मिळवून द्यायचं आहे. मी आपल्याला एवढं सांगेन, मी काय कमवलं यापेक्षा मी लोकांना काय दिलं हे मानणाऱ्यांमधला मी आहे. माझं बारीक लक्ष असतं. इथं कोण जास्त मस्ती करतोय, कोण काय करतोय, त्याचा बरोबर आवाज बंद करतो’, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.फलटण नगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी गजानन चौकात शुक्रवारी (दि. २८) सभा झाली. यावेळी ते बोलत होते. सभेला जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार महेश शिंदे, माजी आमदार दीपक चव्हाण, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिकेतराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे व रघुनाथराजे उपस्थित होते.

‘शेर कभी बुढा नही होता’...फलटणच्या आणि तुमच्या स्वाभिमानासाठी, तसेच लाडक्या बहीण-भावांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला ‘भयमुक्त आणि दहशतमुक्त’ फलटण देण्यासाठी मी इथं आलोय. खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार थांबवा. महिला डॉक्टरला न्याय मिळवून देणार आहे. तसेच आणखी एक सांगतो, ‘शेर कभी बुढा नही होता.’ रामराजे धाडसी आहेत. फलटणला भयमुक्त बनवण्यासाठी त्यांनी शिंदेसेनेसोबत जाण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

फैसला ऑन द स्पॉट...उपमुख्यमंत्री शिंदे यांनी फलटणमधील भर सभेतून उद्योगमंत्री उदय सामंत यांना स्पीकरवर फोन लावला. फलटण येथील सुरवडी एमआयडीसीचा विस्तार व्हावा, यासाठी प्रस्ताव प्रलंबित आहे. ढवलेवाडी, नांदल, सुरवडी व परिसरातील शेतकऱ्यांची जमीन देण्याची तयारी आहे. निवडणुकीची आचारसंहिता झाल्यानंतर एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावा, अशी सूचना सामंत यांना दिली. त्यांनी होकार दिल्यावर तुमच्या वतीने मी शब्द देतोय, असे जाहीर सभेत सांगितले. याच सभेत मंत्री प्रकाश आबिटकर यांना फलटणसाठी १०० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल देण्याची सूचना केली.

‘तेव्हा करेक्ट कार्यक्रम’ : रामराजेएकनाथ शिंदे हे सातारचे भूमिपुत्र आहेत. आता त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घातले आहे. माझ्या कुटुंबाने शिंदे साहेबांबरोबर जायचा निर्णय घेतला आहे. मला स्वतःला कुठलीही महत्त्वाकांक्षा नाही. त्यामुळे प्रोटोकॉल बाजूला ठेवून मी या सभेत आलोय. मी एवढच सांगेन, मी महायुतीत आहे. कोणत्याही पक्षात माझे शत्रू नाहीत. मी जास्त बोलत नाही, शांत असतो. पण जेव्हा करायचा तेव्हा ‘करेक्ट कार्यक्रम’ करतो. ‘जय महाराष्ट्र’ असे रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हणताच उपस्थितांनी जल्लोष केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Warns Falta's Troublemakers: 'I'll Silence Them!'

Web Summary : Eknath Shinde vowed to create a secure Falta, silencing troublemakers. He promised development, including hospital and MIDC expansion. Ramraje supported Shinde, promising action when needed, creating an enthusiastic atmosphere.