Satara: पिंजरा सोडला विहिरीत, पण बिबट्या झेप घेत पळाला शिवारात; तळबीडमधील घटना
By संजय पाटील | Updated: March 29, 2024 12:17 IST2024-03-29T12:15:52+5:302024-03-29T12:17:03+5:30
कऱ्हाड : विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असतानाच पायरीवरून थेट काठावर झेप घेत बिबट्याने शिवारात ...

Satara: पिंजरा सोडला विहिरीत, पण बिबट्या झेप घेत पळाला शिवारात; तळबीडमधील घटना
कऱ्हाड : विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असतानाच पायरीवरून थेट काठावर झेप घेत बिबट्याने शिवारात धुम ठोकली. कऱ्हाड तालुक्यातील तळबीड येथे जानकर वस्तीत शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तळबीड येथील जानकर वस्तीवरील शिवारात बांधिव विहीर आहे. शुक्रवारी सकाळी शेतकरी विहिरीवरील वीज पंप सुरू करण्यासाठी गेले असताना विहिरीत बिबट्या पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभागासह रेस्क्यू टीमचे पथक त्याठिकाणी दाखल झाले. या पथकाने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला त्यामध्ये कोंडण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्याने पिंजऱ्यावरून थेट विहिरीच्या सळईने तयार केलेल्या पायऱ्यांवर झेप टाकून तेथून बाहेर उडी घेतली. त्यानंतर तो शिवारात पसार झाला.
संबंधित बिबट्या मादी जातीचा असून अडीच ते तीन वर्ष वयाचा असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी अधिकाऱ्यांकडे केली.