तुम्ही कोणत्या बाईला फिरवता, पत्नीच्या प्रश्नाने पती संतापला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:43 AM2021-09-27T04:43:08+5:302021-09-27T04:43:08+5:30

सातारा : माझ्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही कोणत्या बाईला फिरवता, असा प्रश्न पत्नीने विचारल्याने संतापलेल्या पतीने हातात काठी घेऊन ...

Which wife do you turn to, the wife's question angered the husband | तुम्ही कोणत्या बाईला फिरवता, पत्नीच्या प्रश्नाने पती संतापला

तुम्ही कोणत्या बाईला फिरवता, पत्नीच्या प्रश्नाने पती संतापला

Next

सातारा : माझ्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही कोणत्या बाईला फिरवता, असा प्रश्न पत्नीने विचारल्याने संतापलेल्या पतीने हातात काठी घेऊन पत्नीला बदडले. ही खळबळजनक घटना सातारा तालुक्यातील सावली पोस्ट रोहोट या गावात घडलीय. याप्रकरणी संबंधित पतीवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पती पत्नीच्या वादाचे अनेक किस्से समोर येत असतात. संतापाच्या भरात पत्नीच्या तोंडून गेलेले शब्द पतीच्या जिव्हारी लागले. तेव्हा हा काैटुंबिक वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. पती काहीही कामधंदा करत नसल्याचा राग पत्नीला होता. त्यातच माझ्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही कोणत्या बाईला फिरवता, असा प्रश्न पत्नीने पतीला केला. त्यामुळे चिडलेल्या पतीने घरातील काठी हातात घेऊन पत्नीच्या डाव्या पायावर, हातावर मारून तिला जखमी केले. या प्रकारानंतर संबंधित महिलेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीवरून पतीवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस नाईक आवळे हे करत आहेत.

Web Title: Which wife do you turn to, the wife's question angered the husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.