गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या भक्तांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:40 IST2021-09-11T04:40:26+5:302021-09-11T04:40:26+5:30
पाचवड : मागील वर्षी कोकणात गावी जाता आलं नाही. पण यंदा काहीही करुन जायचंच होतं. पोलीस प्रशासनाने केलेल्या चोख ...

गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या भक्तांचे स्वागत
पाचवड : मागील वर्षी कोकणात गावी जाता आलं नाही. पण यंदा काहीही करुन जायचंच होतं. पोलीस प्रशासनाने केलेल्या चोख व्यवस्थेमुळे प्रवास सुखाचा सुरु आहे. महामार्गावर गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी होती. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होवू नये यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई स्वत: काही काळ थांबून पाहणी केली.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी दुपारी आनेवाडी टोलनाक्यावर थांबून कोकणाकडे निघालेल्या प्रवाशांची चौकशी केली. यावेळी पोलिस अधिकारी व टोलनाका प्रशासनाकडून सर्व परिस्थिती जाणून घेतली. टोलनाक्यावर कोणत्याही परिस्थितीत कोंडी होता कामा नये, प्रवाशांना त्रास झाल्याची एकही तक्रार कानावर येता कामा नये, असे त्यांनी ठणकावले.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, वाईच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल जानवे कऱ्हाडे, वाईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, भुईंजचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे उपस्थित होते.