माणदेश फाऊंडेशनच्या माध्यमातून माणच्या कोरोनामुक्तीसाठी सहकार्य करू : वाघमोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST2021-06-26T04:26:11+5:302021-06-26T04:26:11+5:30

म्हसवड : ‘माणदेश फाऊंडेशनच्या माध्यमातून माणच्या कोरोनामुक्तीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू,’ अशी ग्वाही आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांनी दिली. ...

We will cooperate for the coronation of Man through Mandesh Foundation: Waghmode | माणदेश फाऊंडेशनच्या माध्यमातून माणच्या कोरोनामुक्तीसाठी सहकार्य करू : वाघमोडे

माणदेश फाऊंडेशनच्या माध्यमातून माणच्या कोरोनामुक्तीसाठी सहकार्य करू : वाघमोडे

म्हसवड : ‘माणदेश फाऊंडेशनच्या माध्यमातून माणच्या कोरोनामुक्तीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू,’ अशी ग्वाही आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे यांनी दिली.

गोंदवले बुद्रुक येथील चैतन्य कोरोना सेंटरला माणदेश फाऊंडेशन, पुणेच्यावतीने एक लाख रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माणदेश फाऊंडेशनचे अध्यक्ष विजयराज पिसे, उपाध्यक्ष प्रवीण काळे, कार्याध्यक्ष अभिजीत माने, उपसभापती तानाजीराव कट्टे, सरपंच जयप्रकाश कट्टे, उपसरपंच संजय माने, अंगराज कट्टे, संदीप सुळे, बाळासाहेब देवकाते उपस्थित होते.

नितीन वाघमोडे म्हणाले, ‘ग्रामीण भागातील गरज ओळखून सुरू केलेल्या चैतन्य कोरोना सेंटरमुळे लोकांना आधार मिळाला आहे. सध्या एक लाख रुपयांची मदत दिली असली तरी कोरोनामुक्तीसाठी कायम सहकार्य करू.’

प्रभाकर देशमुख म्हणाले, ‘कोरोनामुक्तीसाठी माणच्या रत्नांची मोठी मदत होत आहे. या रत्नांच्या सहकार्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर यशस्वी मात करण्यासाठी प्रयत्न करू.’

उपाध्यक्ष प्रवीण काळे यांनी माणदेश फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली. दरम्यान, आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर यांनी दिलेल्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचे यावेळी लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य डॉ. राजेंद्र अवघडे, कर्णराज पाटील, राजेंद्र कट्टे, आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. डी. आर. कट्टे यांनी आभार मानले.

===Photopath===

250621\img-20210625-wa0023.jpg

===Caption===

माणदेश फाउंडेशनच्या माध्यमातून माणच्या कोरोनामुक्तीसाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही आयकर आयुक्त डॉ नितीन वाघमोडे

Web Title: We will cooperate for the coronation of Man through Mandesh Foundation: Waghmode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.