शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला ‘क’ कोयत्याचा आन् ‘ग’ गाडीचाच माहिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मलटण : पोटाची खळगी भरण्यासाठी संसाराचा भार हलका व्हावा म्हणून आपलं घर आणि गाव सोडून अख्ख्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मलटण : पोटाची खळगी भरण्यासाठी संसाराचा भार हलका व्हावा म्हणून आपलं घर आणि गाव सोडून अख्ख्या साखरपट्ट्यातील उसाचा भार आपल्या खांद्यावर उचलत बीड उस्मानाबाद जिल्ह्यातून अनेक ऊसतोड टोळ्या पश्चिम महाराष्ट्रात येतात. त्यातील अनेक महिलांना ‘क’ कोयता अन् ‘ग’ गाडीचा एवढंच माहिती आहे.

फलटणसारख्या तालुक्यात तब्बल चार कारखाने जोमाने ऊस गाळप करत आहेत. या सर्व कारखान्यांना ऊस पुरवठा करण्यासाठी बीड, उस्मानाबादमधून येणाऱ्या टोळ्या रात्रंदिवस कोयत्याला आपला देव मानून कष्ट करत असतात. आपल्या घरधन्याबरोबर तितक्याच जोमाने काम करणाऱ्या आणि कारखान्यांना ऊस पुरवणाऱ्या ऊसतोड महिलांची कैफियत उसाच्या फडातच पाचटाखाली दबून जाते.

भिलकटी, वडजल, निंभोरे, साखरवाडी, फडतरवाडी येथे ऊसतोड अंतिम टप्प्यात सुरू आहे. या महिलांचं संपूर्ण जीवन फडातच कष्ट करण्यात जातं. कारण नवऱ्याबरोबर तिचा भाऊ, वहिनी, बाप, चुलता, आई सगळी-सगळी कोयत्यासह उसाच्या फडात राबत असतात. सगळी नाती हिरव्यागार उसाच्या बुडख्यात खपत असतात; पण कष्ट कोणालाच चुकलं नाही. कधी-कधी प्यायला पाणी पण मिळत नाही. कोपटवरून थापून आणलेल्या भाकरी उभ्या उभ्याच खायच्या. आणि ट्रॅक्टर ट्रॉलीत उसाच्या मोळ्यांचे डोंगरच्या डोंगर रचायचे. आपल्या चहातील साखरेच्या प्रत्येक दाण्यावर या कष्टकरी महिलांच्या कष्टाचा गोडवा आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई या गावातून आलेलं ऊसतोड कुटुंबातील महिला सविता साठे ही ऊसतोड महिला सांगते, ‘शाळा कसली असती ती आम्ही बघितलीच नाही; पण ऊसतोडणीच शिक्षण लहानपणापासून मिळालं. आम्हाला ‘क’ कोयत्याचा आणि ‘ग’ गाडीचाच माहिती आहे.’

याच टोळीतील अश्विनी सांगते, ‘जगातलं सगळ्यात जास्त कष्ट करणारी स्त्री म्हणजे ऊसतोड महिला आहे. तिच्या इतकं कष्ट जगात कुणालाच नाहीत, आता आम्हाला बी वाटतं आमच्या पोरांनी ही काम करू नाय त्यांनी शिकावं?’ उसाच्या गाड्या भरून राहिलेलं वाढं गोळा करत महिला बोलत होत्या. महिला दिन असतो, हे पण ज्यांना माहीत नाही त्यांनी कसला महिला दिन साजरा करायचा.

(कोट )

आमच्या किती पिढ्या हे काम करत आहेत हे आता आम्हाला पण सांगता येत नाही पण पुढची पिढी नक्कीच फडात नसेल, असे मनापासून वाटते.

-परमेश्वर साठे, ऊसतोड मजूर, गेवराई, बीड

(चौकट)

कामगारांचे अनेक प्रश्न तसेच...

ऊसतोड कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. दरवर्षी त्याच्यावर बोललं जातं; पण प्रश्न कायम आहेत. त्यात महिला कामगारांचे तर खूपच प्रश्न आहेत. शिक्षणच त्यांना त्यांच्या कष्टापासून दूर नेऊ शकते.

०७ऊसतोड महिला

फलटण तालुक्यात बीड जिल्ह्यातून आलेल्या महिला रात्री-अपरात्रीही उसाच्या मोळ्या बांधून ट्रॅक्टर-ट्राॅलीमध्ये भरत असतात.