आम्ही म्हसवडकरचा उपक्रम प्रेरणादायी : चंद्रकांत जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:25 IST2021-06-23T04:25:02+5:302021-06-23T04:25:02+5:30
सातारा : महाराष्ट्रातील पहिल्या लोकसहभागातून उभारलेल्या ‘आम्ही म्हसवडकर कोविड हॉस्पिटल’ येथील कोविड रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. म्हसवड ...

आम्ही म्हसवडकरचा उपक्रम प्रेरणादायी : चंद्रकांत जाधव
सातारा : महाराष्ट्रातील पहिल्या लोकसहभागातून उभारलेल्या ‘आम्ही म्हसवडकर कोविड हॉस्पिटल’ येथील कोविड रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. म्हसवड शहर शिवसेनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आहे, असे उद्गार शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी काढले.
सातारा जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते व ‘आम्ही म्हसवडकर’ ग्रुपच्या सदस्यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले. या वेळी चंद्रकांत जाधव यांनी रुग्णालयातील रुग्णांची विचारपूस केली व त्यांना आधार दिला. हॉस्पिटलमधील रुग्णांना मिळणाऱ्या सेवांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमास शिवसेनेचे माण तालुकाप्रमुख बाळासाहेब मुलाणी, खटाव तालुकाप्रमुख युवराज पाटील, तालुका उपप्रमुख शिवदास केवटे, ‘आम्ही म्हसवडकर’ ग्रुपचे सदस्य व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष युवराज सूर्यवंशी, कैलास भोरे, एल. के. सरतापे, डॉ. राजेंद्र मोडासे, अॅड. अभिजित केसकर, प्रशांत दोशी, संजय टाकणे, डॉ. राजेश शहा, खंडेराव सावंत, आदित्य सुकरे तसेच विभागप्रमुख अमित कुलकर्णी, वडुज शहरप्रमुख किशोर गोडसे, म्हसवड शहर उपप्रमुख आनंद बाबर, शाखाप्रमुख प्रीतम तिवाटणे, सोनू मदने तसेच शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन शहरप्रमुख राहुल मंगरुळे यांनी केले.
फोटो ओळ : म्हसवड येथे कोरोनाग्रस्त रुग्णांना शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते फळांचे वाटप करण्यात आले.