आमचं ठरलं गोरेंना पाडणार, सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 15:06 IST2019-07-15T15:04:18+5:302019-07-15T15:06:03+5:30
आमदार जयकुमार गोरे यांचे माण खटाव तालुक्याच्या विकासात योगदान नाही. निवडणुकीच्या तोंडावर ते केवळ चमकोगिरी करत असून आमचं आता ठरलंय आमदार जयकुमार गोरे यांचा दुप्पट मतांनी पराभव करणार, असा इशारा येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत देण्यात आला.

आमचं ठरलं गोरेंना पाडणार, सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत निर्णय
सातारा : आमदार जयकुमार गोरे यांचे माण खटाव तालुक्याच्या विकासात योगदान नाही. निवडणुकीच्या तोंडावर ते केवळ चमकोगिरी करत असून आमचं आता ठरलंय आमदार जयकुमार गोरे यांचा दुप्पट मतांनी पराभव करणार, असा इशारा येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत देण्यात आला.
साताऱ्यातील एका हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या बैठकीला भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख रासपचे जिल्हाध्यक्ष मामू शेठ विरकर, डॉ. संदीप पोळ, वडूजचे नगरसेवक अनिल माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार गोरे ज्या कुठल्याही पक्षातून उभे राहतील, तिथे सर्वपक्षीय उमेदवार एकमताने दिला जाणार आहे.