शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरणात ९५ टीएमसीवर पाणीसाठा, विसर्ग सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 17:07 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून सकाळपर्यंत कोयनानगरला ५७, महाबळेश्वर ५९ आणि नवजाला ७६ मिलिमीटरची नोंद झाली. या पावसामुळे कोयनेत आवक वाढत असून धरणसाठा ९५.६९ टीएमसी झाला होता. तर धरणाचे सहा दरवाजे चार फुटांवर स्थिर असून त्यामधून २५७७१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

ठळक मुद्दे कोयना धरणात ९५ टीएमसीवर पाणीसाठा, विसर्ग सुरूच दरवाजे चार फुटावर स्थिर; महाबळेश्वर ५९ तर नवजाला ७६ मिलिमीटर पाऊस

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून सकाळपर्यंत कोयनानगरला ५७, महाबळेश्वर ५९ आणि नवजाला ७६ मिलिमीटरची नोंद झाली. या पावसामुळे कोयनेत आवक वाढत असून धरणसाठा ९५.६९ टीएमसी झाला होता. तर धरणाचे सहा दरवाजे चार फुटांवर स्थिर असून त्यामधून २५७७१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.मागील तीन आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. पश्चिम भागात अधिक करुन हा पाऊस होत आहे. सुरुवातीला कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना, महाबळेश्वर परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे कोयना, कृष्णा, नीरा, उरमोडी, वेण्णा नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली. तर कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी सारख्या प्रमुख धरणांतील साठाही वेगाने वाढू लागला.

त्यातच कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाल्यामुळे १५ आॅगस्टपासूनच पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. तर इतर धरणांमधूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला. परिणामी कोयना, कृष्णा नदीला पूर आला. मात्र, काही दिवसांपूर्वी पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे धरणांतही पाणी कमी येत असल्यामुळे विसर्ग कमी करण्यात आला. कोयनेचे दरवाजे १० फुटांपर्यंत उघडण्यात आले होते. तेही बंद करण्यात आले. फक्त पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू होता. मात्र, पाऊस सुरूच आहे. पावसात जोर नसलातरी धरणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

रविवारी सकाळीही कोयना धरणाचे दरवाजे चार फुटांवर होते. सहा दरवाजातून २५७७१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सूरू होता. तर पायथा वीजगृहातून कायमच २१०० क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे कोयनेतून २७८७१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. हे पाणी कोयना नदीपात्रात जात आहे.रविवारी सकाळपर्यंत कोयनानगर येथे ५७ तर जूनपासून आतापर्यंत ३९३६ मिलिमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला ५९ आणि आतापर्यंत ४३८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर नवजाला सकाळपर्यंत ७६ आणि आतापर्यंत ४५१२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

 

 

टॅग्स :RainपाऊसSatara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण