शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेतील पाणीसाठा ८३ टीएमसी खालीच, सातारा जिल्ह्याच्या पूर्वकडे पावसाची प्रतीक्षा कायम 

By नितीन काळेल | Updated: August 10, 2023 12:45 IST

महाबळेश्वरला १९ मिलीमीटरची नोंद

सातारा : जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची प्रतीक्षा कायम असून पश्चिमेकडे उघडझाप सुरू आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली आहे. परिणामी कोयनेतील धरणसाठा अजून ८३ टीएमसी खालीच आहे. तर गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला १९ मिलीमीटर झाला आहे.पावसाळ्याचे दोन महिने होऊ गेले आहेत. आतापर्यंत काही भागात चांगला पाऊस झाला. तर कोठे अजुनही प्रतीक्षा आहे. त्याचबरोबर आतापर्यंत पूर्व भागातील माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यात कमी पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीवरही परिणाम झाला. तर पश्चिमेकडे गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस पडला. पण, अजुनही धरणे भरलेली नाहीत. त्यातच सध्या काही भागात पावसाची उघडीप आहे. तर कोठे अत्यल्प स्वरुपात पाऊस हजेरी लावत आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १५ तर नवजाला १४ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३१४८ आणि महाबळेश्वर येथे ४१६९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर सर्वाधिक पावसाची नोंद ही नवजा येथे ४४७९ मिलीमीटर इतकी झालेली आहे. त्याचबरोबर पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा भागात पावसाची उघडझाप सुरू आहे.पश्चिम भागातच मोठे पाणी प्रकल्प आहेत. या प्रकल्पातील पाणीसाठ्यात मागील आठवड्यात मोठी वाढ झालेली नाही. कारण, तुरळक स्वरुपात पाऊस होत असल्याने धरणातील आवक कमी झालेली आहे. गुरुवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात २७६१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणपाणीसाठा ८२.८३ टीएमसी झाला होता. दोन दिवसांपासून धरणातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणीRainपाऊस