पुसेगाव औद्योगिक वसाहतीसाठी पाणी आरक्षित
By Admin | Updated: June 6, 2014 00:02 IST2014-06-05T23:57:55+5:302014-06-06T00:02:29+5:30
शशिकांत शिंदे : कण्हेर धरणातील पाणी पुसेगाव औद्योगिक क्षेत्राला

पुसेगाव औद्योगिक वसाहतीसाठी पाणी आरक्षित
कोरेगाव : पुसेगावसह परिसरातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत मंजूर आहे. मात्र, प्रकल्पाचे काम आवश्यक तेवढ्या गतीने होत नव्हते. या भागाच्या विकासाठी हा प्रकल्प होणे गरजेचे आहे, त्यासाठी संबंधित मंत्री व अधिकार्यांच्या बैठका घेतल्या. म्हणूनच या प्रकल्पासाठी कण्हेर धरणातून १६ दशलक्ष घनमीटर इतके पाणी आरक्षणाच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी दिली.
जिहे-कटापूर उपसा सिंचन योजनच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचे काम अंतिम टप्प्यात आहे. या योजनेसाठी मंजूर निधीस मान्यता मिळाल्यामुळे पहिला टप्पा (नेर तलाव) तातडीने मार्गी लागेल आणि शेती पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल.
युवकांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी पुसेगाव औद्योगिक वसाहतीसंदर्भातील औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्याच्याबाबतच्या सूचना दिल्या.
त्यानुसार संबंधितांनी हा प्रस्ताव १ आॅक्टोबर २०१३ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई यांना सादर केला असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)