शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
3
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
4
केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
5
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
6
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
7
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
8
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
9
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
10
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
11
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
12
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
13
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
14
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
15
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
16
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
17
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
18
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
19
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
20
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर

कृष्णा कालव्यात पाणी सोडले; सातारा, सांगलीच्या चार तालुक्यातील शेतीक्षेत्राला लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 13:01 IST

पिकांना संजीवनी 

कऱ्हाड : कऱ्हाडच्या कृष्णा कालव्याच्या माध्यमातून चार तालुक्यांतील शेतीक्षेत्रासाठी पाण्याचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाने सोमवारपासून कालव्यात २२० क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, या आवर्तनाचा कालावधी २५ दिवसांचा आहे. त्यामुळे चार तालुक्यातील शेतीक्षेत्राला ऐन उन्हाळ्यात संजीवनी मिळणार आहे.कऱ्हाड तालुक्यात खोडशी येथे कृष्णा नदीवरून कॅनॉलला प्रारंभ झाला आहे. हा कालवा सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड व सांगली जिल्ह्यातील वाळवा, पलूस आणि तासगाव या चार तालुक्यांतील ३४ गावातून वाहत जाऊन येरळाला मिळतो. सुमारे ८६ किलोमीटर लांबीच्या या कॅनॉलवर शेती, पशुधन तसेच शेतकऱ्यांचे जीवन अवलंबून आहे. ३४ गावे व सुमारे १३ हजार ३६० हेक्टर शेतीक्षेत्र या कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून आहे. गत महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढली असल्यामुळे सध्या कॅनॉलवर अवलंबून असणाऱ्या शेतीला पाण्याची मोठी आवश्यकता होती. उन्हाची दाहकता वाढल्यामुळे तसेच पाणी नसल्यामुळे पिके होरपळत होती. त्यामुळे कॅनॉलला पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती.पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांची मागणी आणि पिकांना असलेली पाण्याची गरज लक्षात घेता सोमवारपासून कॅनॉलमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. २२० क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा कॅनॉलमध्ये विसर्ग केला जात असून, हे पाणी कऱ्हाडसह चार तालुक्यातील शेतीक्षेत्राला संजीवनी देणारे ठरणार आहे. २५ दिवस हे आवर्तन सुरू राहणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अभियंता बी. आर. पाटील यांनी दिली.

चार स्टेशनवर पाण्याची उपलब्धताकृष्णा कॅनॉलचे चार स्टेशन आहेत. या स्टेशननुसार पाण्याची उपलब्धता शेतकऱ्यांना करून दिली जाणार आहे. नियोजनानुसार सांगली जिल्ह्यातील येळावीला सुरुवातीला पाणी उपलब्ध होणार असून, त्यानंतर किर्लाेस्करवाडी, ताकारी आणि अखेरच्या टप्प्यात कऱ्हाड तालुक्यातील शेणोली स्टेशनअंतर्गत शेतीला पाणी पुरवठा होणार आहे.

कृष्णा कॅनॉलच्या लाभक्षेत्रातील प्रत्येक शेतजमिनीला पाण्याचा लाभ मिळावा, यासाठी पाटबंधारे विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे. सोमवारपासून कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात आले असून, २२० क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग होत आहे. यापुढेही नियोजनानुसार पाण्याचे आवर्तन देण्यात येणार आहे. - बी. आर. पाटील, अभियंता, पाटबंधारे विभाग, कऱ्हाड

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSangliसांगलीWaterपाणीfarmingशेती