शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कोयना धरणातून पुन्हा पाणी सोडले, पावसामुळे आवक वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 15:51 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडील कोयना धरणपाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाण्याची आवक वाढली आहे. तसेच धरणसाठा काठावर असल्याने पायथा ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडील कोयना धरणपाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पाण्याची आवक वाढली आहे. तसेच धरणसाठा काठावर असल्याने पायथा वीजगृहातून पुन्हा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बुधवारी दुपारी एक युनिट सुरू करून १ हजार ५० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.जिल्ह्यात परतीचा पाऊस अजूनही पडत आहे. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात अनेक ठिकाणी मागील आठवड्यापासून पाऊस होत आहे. यामुळे तलावांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच ओढे खळाळून वाहत आहेत. तसेच पश्चिम भागातही पाऊस पडत आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ६७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. यामुळे कोयना धरणात सुमारे अडीच हजार क्युसेक वेगाने पाणी येत आहे. त्यातच धरणातील पाणीसाठा १०४.८२ टीएमसी झाला होता. पाणीसाठ्याची टक्केवारी ९९.५९ झाली आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने पाणी विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करण्यात आले. त्यातून १ हजार ५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. तर २४ तासांत महाबळेश्वरलाही २८ मिलिमीटरची नोंद झालेली आहे.जिल्ह्यात एक जूनपासून आतापर्यंत पाथरपूंजनंतर नवजा येथे सर्वाधिक ६ हजार ८१७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. यानंतर महाबळेश्वरला ६ हजार ५७० आणि कोयना येथे ५ हजार ६९६ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर यावर्षी चांगला पाऊस झाल्याने पश्चिम भागातील कोयनासह धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडी ही प्रमुख धरणे भरलेली आहेत. सध्या या सर्वच धरणांत १४८ टीएमसीवर पाणीसाठा झालेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरणWaterपाणी