शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कृष्णा-वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ, शाहू महाराज यांची समाधी गेली पाण्याखाली

By सचिन काकडे | Updated: May 23, 2025 19:39 IST

सचिन काकडे  सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, संगम माहुली येथील कृष्णा-वेण्णा या नद्यांच्या पाणीपातळीत शुक्रवारी ...

सचिन काकडे सातारा : सातारा शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, संगम माहुली येथील कृष्णा-वेण्णा या नद्यांच्या पाणीपातळीत शुक्रवारी लक्षणीय वाढ झाली. या पाण्यामुळे नदीपात्रात असलेली छत्रपती शाहू महाराज यांची समाधी निम्मी पाण्याखाली गेली असून, काशीविश्वेश्वर मंदिराच्या पायऱ्यांनाही पाणी टेकले आहे.सातारा जिल्ह्यात दरवर्षी १५ जूननंतर मान्सून सक्रिय होतो. पावसाचा जोर हळूहळू वाढत गेल्यानंतर धोम व कण्हेर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातो. यानंतर संगम माहुली येथे असलेल्या कृष्णा व वेण्णा या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊन माहुलीचा घाट पाण्याखाली जातो. साधारण जुलै, ऑगस्टमध्ये अशी परिस्थिती निर्माण होते; परंतु यंदा मे महिन्यातच वळीव पावसाने दमदार हजेरी लावल्याने नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली. तसेच सातारा शहराचे संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांची समाधीदेखील निम्मी पाण्याखाली गेली. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असली तरीदेखील कैलास स्मशानभूमी येथील सर्व अग्निकुंड सुस्थितीत आहेत. दरम्यान, मे महिन्यातच प्रथमच संगम माहुली घाट जलमय झाल्याने पाणी पाहण्यासाठी घाटावर नागरिकांची तुफान गर्दी झाली होती.

जून, जुलैनंतर संगम माहुलीचा घाट पाण्याखाली जातो हा आजवरचा इतिहास; परंतु मे महिन्यातच वळीव पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नद्यांना पूर आल्यासारखी स्थिती आहे. छत्रपती शाहू महाराज यांची निम्मी समाधी पाण्याखाली गेली असून, गेल्या तीस-चाळीस वर्षांत असे चित्र प्रथमच पाहायला मिळाले. - प्रकाश माने, ग्रामपंचायत सदस्य, संगम माहुली

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसriverनदीWaterपाणी