शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Satara: कोयनेतून विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा; धरणातील पाणीसाठा ६५ टीएमसीजवळ

By नितीन काळेल | Updated: July 23, 2024 12:28 IST

पायथा वीजगृहातून विसर्ग : ; नवजाला १४५ मिलीमीटर पाऊस 

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस असून २४ तासांत कोयनाला १६४ तर नवजा येथे १४५ मिलीमीटर पर्जन्यमान झाले. तसेच कोयना धरणातही पाण्याची चांगली आवक आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या एक युनीट सुरू असून त्यातून १ हजार ५० क्यूसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्याच्या पश्चिम भागात चार दिवसांपासून पावसाने जाेर धरला आहे. आभाळ फाटल्यासारखा पाऊस होत आहे. यामुळे ओढे-नाले एक होऊन वाहत आहेत. तसेच कोयना धरणक्षेत्रातही दमदार पाऊस होऊ लागला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत चालली आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १६३ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे. तर महाबळेश्वरला १४० मिलीमीटर पाऊस झाला. तर आतापर्यंत कोयनेला २ हजार ७३२ आणि नवजा येथे ३ हजार २२८ मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याचबरोबर कोयना धरणक्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने पाण्याची आवक चांगली होत आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास धरणात सुमारे ४८ हजार क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात ६४.५५ टीएमसी पाणीसाठा झालेला. २४ तासांत धरणात चार टीएमसीहून अधिक पाणीसाठा वाढला आहे. त्यातच कोयना धरण व्यवस्थापनाने पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने पायथा वीजगृहाचे एक युनीट सुरू करुन विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी सकाळी १० वाजता पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करुन १ हजार ५० क्यूसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी कोयना नदीत जात आहे. त्यामुळे कोयना नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरणriverनदी