शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

Satara: कोयनेतील पाण्याची आवक थांबली; नवजाला दोन मिलीमीटर पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 16:08 IST

धरणांत पूर्ण पाणीसाठा होण्यासाठी अजूनही किती टीएमसी पाण्याची आवश्यकता.. वाचा

सातारा : जिल्ह्यात पावसाची उघडीप असून २४ तासांत नवजा येथे दोन तर महाबळेश्वरला एक मिलीमीटरची नोंद झाली. त्यातच धरणक्षेत्रात ही पावसाची विश्रांती आहे. यामुळे कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवकही पूर्णपणे थांबली आहे. पाणीसाठा ८७.४५ टीएमसीवर स्थिर आहे.जून आणि जुलै महिन्यात जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली. पण, ऑगस्ट महिना सुरू होताच पावसाने सुटी घेतल्यासारखी स्थिती आहे. पश्चिम भागातीलच कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह कांदाटी खोऱ्यात तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्याचबरोबर कोयनेसह धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाने ब्रेक घेतला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ होताना दिसत नाही.बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे पाऊस पडल्याची नोंद नाही. नवजा आणि महाबळेश्वरला किरकोळ नोंद झाली. त्याचबरोबर प्रमुख धरण क्षेत्रातही पावसाची उघडीप आहे. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक थांबली आहे. सकाळच्या सुमारास धरणात ८७.४५ टीएमसी पाणीसाठा होता. त्यामुळे धरण भरण्यासाठी अजून १७ टीएमसी पाण्याची गरज आहे. तर सध्या धोम धरणात १२.५९ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. बलकवडीत ३.७६, कण्हेर ९.४४, उरमोडी धरणात ९.३८ आणि तारळी धरणात ५.१६ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. ही प्रमुख धरणे सुमारे ८६ टक्के भरली आहेत. तर या धरणांत पूर्ण पाणीसाठा होण्यासाठी अजूनही २० टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.

महाबळेश्वरला ३,५६८ मिलीमीटर पर्जन्यमान..जिल्ह्यात मागील दोन महिन्यापासून पाऊस सुरू आहे. आतापर्यंत सर्वाधिक पर्जन्यमानाची नोंद पाथरपूंज येथे झालेली आहे. त्यानंतर महाबळेश्वर येथे ३ हजार ५६८ तर नवजाला ३ हजार ४४५ आणि कोयनानगरला ३ हजार ७३ मिलीमीटरची नोंद झालेली आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे.