‘एफआरपी’साठी आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:37 IST2021-04-12T04:37:01+5:302021-04-12T04:37:01+5:30
कऱ्हाड : गत हंगामातील एफआरपी पूर्ण न करणाऱ्या साखर कारखानदारांविरोधात लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. ...

‘एफआरपी’साठी आंदोलनाचा इशारा
कऱ्हाड : गत हंगामातील एफआरपी पूर्ण न करणाऱ्या साखर कारखानदारांविरोधात लवकरच तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते अनिल घराळ, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष अशोक माने यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, हंगाम संपत आला तरी अद्याप काही साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे बिले अदा केलेली नाहीत. अशा साखर कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच आरआरसी काढण्यात यावी. शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना दिले. यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष हिंदूराव पाटील, मानसिंगराव पाटील, कऱ्हाड दक्षिण अध्यक्ष संजय थोरात, लालासाहेब पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा रंजना पाटील उपस्थित होत्या.