शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त विसापूरची ठिबकयुक्तकडे वाटचाल

By admin | Updated: July 29, 2016 23:27 IST

खोरेमुक्तीसाठी प्रयत्न : शिवारात जागोजागी पाण्याचे साठे!

सातारा : टंचाईग्रस्त म्हणून ओळख असणाऱ्या खटाव तालुक्यातील डोंगर कपारीत वसलेल्या विसापूरकरांनी लोकसहभागाची ताकद काय असते, ते शासनाचे जलयुक्त शिवार अभियान राबवून दाखवून दिले आहे. मोठ्या प्रमाणातील लोकसहभाग, श्रमदान व शासनाच्या मदतीने जलयुक्त शिवार अभियानाची कामे संघटितपणे केल्याने आज विसापूरच्या शिवारात जागोजागी पाण्याचे साठे पाहायला मिळत आहेत. जलयुक्त बनलेल्या विसापूरची ठिबकयुक्त आणि खोरेमुक्तीकडे जाणारी वाटचाल निश्चितच प्रेरणादायी बनेल. डोंगर कपारीत वसलेल्या विसापूरची लोकसंख्या अवघी ५ हजार. गावचे पर्जन्यमान सरासी ६५० ते ७०० मि.मी. गावामध्ये ५७६ हेक्टर बागायत क्षेत्र, ६५० जिरायत क्षेत्र तर पडीक क्षेत्र व डोंगरमाथा ते पायथा ४१७.८७ हेक्टर असे एकूण १६४४.६७ हेक्टर भौगोलिक क्षेत्र. गावामध्ये असणारे राम ओढ्याचे तसेच गाव ओढ्याचे लोक वर्गणीतून रुंदीकरण व खोलीकरण केले. या ओढ्यांवर १६ वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून २.२५ कोटी लिटर पाणी अडविले गेले आहे. लोकवर्गणी, कृषी विभाग, यांत्रिकी विभाग यांच्या मदतीने माथा ते पायथा या संकल्पनेनुसार गावामध्ये ४५० हेक्टर डीपसीसीटी काम पूर्ण केलेले आहे. इजाळीमधून ७ हजार ४४० क्युबीक मीटर, वाणदरामधून ९९२० क्युबीक मीटर, आवारवाडीमधून ८०८० क्युबीक मीटर तर कोकाटेमधून ३२०० क्युबीक मीटर अशा चार पाझर तलावांमधून एकूण २८ हजार ६४० क्युबीक मीटर गाळ लोकसहभाग व यांत्रिकी विभाग आलोरे यांच्या मदतीने काढण्यात आला. हा गाळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये टाकून शेत जमीनही वहिवाटीत आणली आहे. लोकवर्गणीतून ६ माती नालाबांधमधून गाळ काढून त्यांची पाणी साठवण क्षमता वाढविली आहे. लोकवर्गणीतून ५ सिमेंट बंधाऱ्यांतील गाळ काढला आहे. रोजगार हमी योजनेतून ५ विहिरींचे व २ विंधन विहिरींचे पुनर्भरण केले आहे. टंचाईमुक्तीचा शिक्का विसापूरकरांनी आपल्या कामातून पुसून टाकला आहे. जलयुक्तकडून ठिबकयुक्तकडे आणि खोरेमुक्तीकडे विसापूरची वाटचाल ही अन्य गावांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. (प्रतिनिधी) गाव ठिबकयुक्त करणारजिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या प्ररणेने जनजगृती करून लोकसहभागातून १६ वनराई बंधारे बांधून सुमारे अडीच कोटी लिटर पाणीसाठा निर्माण केला आहे. अवघ्या दीड महिन्यात ४५० हेक्टर सीसीटीचे काम पूर्ण केले. यामध्ये यांत्रिकी विभागामार्फत १०० ते ११० हेक्टर आणि उर्वरित लोकसहभागातून करण्यात आलेले आहे. सध्या गावामध्ये कृषी विभाग आणि स्थानिकस्तर यांच्या माध्यमातून १४ सिमेंट बंधारे उपलब्ध झाले आहेत. गावामध्ये निर्माण झालेला पाणीसाठा काटकसरीने वापरण्यासाठी गाव ठिबकयुक्त आणि खोरेमुक्त करत आहोत. यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य मिळत असल्याची भावना सरपंच सागर साळुंखे यांनी बोलून दाखविली.