कऱ्हाड जिल्ह्याची प्रतीक्षा कायम : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:37 IST2018-04-03T00:37:46+5:302018-04-03T00:37:46+5:30
कऱ्हाड : मुख्यमंत्री पदावर पृथ्वीराज चव्हाण असताना अनेकांनी ‘जिल्हा कºहाड’चं स्वप्न पाहिलं. काहींनी तर छातीठोकपणे ‘जिल्हा होणारंच’, असंही सांगितलं; पण अद्याप जिल्ह्याचं घोड पुढं सरकलेलं नाही.

कऱ्हाड जिल्ह्याची प्रतीक्षा कायम : राजकीय इच्छाशक्तीचा अभाव
प्रमोद सुकरे।
कऱ्हाड : मुख्यमंत्री पदावर पृथ्वीराज चव्हाण असताना अनेकांनी ‘जिल्हा कºहाड’चं स्वप्न पाहिलं. काहींनी तर छातीठोकपणे ‘जिल्हा होणारंच’, असंही सांगितलं; पण अद्याप जिल्ह्याचं घोड पुढं सरकलेलं नाही. कित्तेक वर्षांपासून ‘प्रस्तावित’ असलेली ही बाब आजही लालफितीत आहे. अधूनमधून चर्चेचा धुरळा उडतो. मात्र, हा धुरळा हवेतच विरतो.
कºहाड जिल्हा व्हावा, ही लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्यांचीही इच्छा आहे. मात्र, याबाबत कोणताच पाठपुरावा होताना दिसून येत नाही.
दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी म्हणून कऱ्हाड ला वेगळे महत्त्व आहे. तसेच जिल्हा होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वच बाबी कऱ्हाड मध्ये आहेत. कऱ्हाड दक्षिण आणि कऱ्हाड उत्तर अशा दोन मतदार संघांत हा तालुका विभागला गेला आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका म्हणून कऱ्हाड कडे पाहिले जाते. येथील महसुलाचा आकडाही जिल्ह्याच्या एकूण महसुलात कित्तेक पटींनी जास्त आहे. उद्योग, व्यवसायामध्येही शहराचा लौकिक आहे. रेल्वे स्टेशन, विमानतळासह दळणवळणाच्या सुविधा कºहाडला जास्त आहेत.
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर कऱ्हाड जिल्हा होण्याच्या सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या होत्या. चव्हाण यांनी कऱ्हाडसाठी स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच भूकंप संशोधन केंद्र मंजूर केले. प्रशासकीय इमारत तसेच बसस्थानकासाठीही भरधोस निधी दिला. शहराला जोडणाºया सर्वच रस्त्यांचे चौपदरीकरण करण्यास मंजुरी दिली. ही सर्व कामे कºहाडला जिल्हा करण्याच्या दृष्टीने सुरू असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल संपत आला तरी कºहाडला जिल्हा घोषित करण्यात आले नाही. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने मुख्यमंत्री पदाच्या अखेरच्या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून कºहाड जिल्ह्याची घोषणा होईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, तसेही झाले नाही. २०१२ मध्ये कºहाडसह पंढरपूर आणि बारामती हे तीन नवे जिल्हे करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय कामकाज सुरू असल्याचे सांगितले जात होते. मात्र, तीही फक्त चर्चाच ठरली. आजपर्यंत अनेक संघटनांनी याबाबत प्रशासनाला निवेदने दिली आहेत.
पाच तालुक्यांचा होऊ शकतो समावेश
कऱ्हाडला पाटण तालुक्यासह सांगली जिल्ह्यातील वाळवा, शिराळा, कडेगाव हे तालुकेही जवळ पडतात. त्यामुळे कºहाडला स्वतंत्र जिल्हा घोषित करावा, ही मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. कºहाड जिल्हा करायचा झाल्यास पाटण, वाळवा, शिराळा, कडेगाव तसेच अन्य काही भाग समाविष्ट करावा लागेल.
रेल्वे जंक्शनम ळेऔद्योगिक चालना
कºहाड-चिपळूण लोहमार्गामुळे कोकण भाग उर्वरित महाराष्ट्राशी जोडला जाणार आहे; पण त्याचबरोबर याचा सर्वात जास्त फायदा कºहाडला होणार आहे. या मार्गामुळे कºहाडचे औद्योगिक क्षेत्र झपाट्याने विस्तारण्यास मदत होणार आहे. रेल्वेचे जंक्शन कºहाडला प्रस्तावित आहे. त्यामुळे साहजिकच कऱ्हाड चे महत्त्व आणखी वाढणार आहे. तसेच भूकंप संशोधन केंद्रासह इतर सोयी-सुविधांसाठीही हा मार्ग पोषक ठरणार आहे.
काही दिवसांपूर्वी माणदेश हा स्वतंत्र जिल्हा करण्याचा विषय चर्चेत आला. त्यामुळे कºहाडकरांच्या भावना पुन्हा जागृत झाल्या. अनेक संघटना, संस्थांनी पुन्हा एकदा शासन दरबारी कºहाड स्वतंत्र जिल्हा व्हावा, या मागणीची निवेदने दिली. परंतु निवेदनांचा हा सीलसिला कधी संपणार? हे मात्र सांगता येत नाही.
जिल्ह्याचं ठिकाण हे सर्वसामान्य लोकांसाठी मध्यवर्ती असणं गरजेचं आहे. मात्र, सातारा जिल्ह्याचा विचार करता कऱ्हाड -पाटण तालुक्यातील लोकांना सध्याचा जिल्हा सोयीचा ठरत नाही. म्हणून तर उपप्रादेशिक परिवहन विभागाचं स्वतंत्र कार्यालयकऱ्हाड ला झालं आणि एमएच ५० अशी नवी ओळख मिळाली. त्यादृष्टीने कऱ्हाड जिल्हा झाल्यास कºहाड, पाटण तालुक्यातील लोकांना हा जिल्हा सोयीचा ठरणार आहे. तसेच वाळवा, शिराळा आणि कडेगाव या सांगली जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा कऱ्हाड जिल्ह्यात समावेश केल्यास त्यांचीही सोय होणार आहे.
- राहुल खोचीकर,सामाजिक का र्यकर्ते,कऱ्हाड