वाईच्या विद्यार्थ्यांनी केली रायरेश्वर स्वच्छता
By Admin | Updated: January 14, 2015 23:37 IST2015-01-14T20:52:41+5:302015-01-14T23:37:35+5:30
विद्रुपीकरण थांबवा

वाईच्या विद्यार्थ्यांनी केली रायरेश्वर स्वच्छता
वाई : घरातील स्वच्छतेबरोबरच सार्वजनीक स्वच्छतेला महत्त्व दिले पाहिजे. मुलांमध्ये या गोष्टी रूजाव्यात म्हणून येथील ‘सुयश’ च्या विद्यार्थ्यांनी रायरेश्वरवर स्वच्छता मोहिम राबिवली. याची समज आल्याने शैक्षणिक सहलीसाठी रायरेश्वर येथे गेलेल्या सुयश कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांनी सहलीचा आनंद घेण्याबरोबर स्वच्छता करण्याचा निर्धार केला व रायरेश्वरच्या लोखंडी शिडीवरून वर गेल्यानंतर रायरेश्वरच्या मंदीरापर्यंतच्या रस्त्याच्या परिसरात दिसणाऱ्या प्लॅस्टीक पिशव्या, पाण्याच्या व शित पेयाच्या मोकळ्या बाटल्या गोळाकरत ठिक-ठिकाणी एकत्र करून जाळ्यात आले. व या राष्ट्रीय अभियानात खारीचा वाटा उचलला.प्लास्टीकच्या आवरणात अनेक वस्तू मिळत असल्याने लोकांकडून अस्वच्छता पसरत आहे. यातून प्रेक्षीणीय, ऐतिहासिक स्थळे सुद्धा सुटली नाहीत. या ठिकाणी पाण्याच्या मोकळ्या बाटल्या, मोकळ्या खाद्य पदार्थांच्या पिशव्यांचा खच पडलेला असतो. या पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी स्वच्छतेविषयी काही पथ्ये पाळली तर आपण सार्वजनिक स्वच्छता राखू शकतो. रायरेश्वर परिसरात स्वच्छतेनंतर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा कचरा गोळा करण्यात आला. त्याबरोबरचं काचेच्या बाटल्यांचा खचही होता.उपक्रम यशस्वी करण्यासाठी मच्छिंद्र मांढरे, ऋषिकेश टिके, सुरज चिकणे, प्रणव जमदाडे, नयना भिलारे, सुजाता लामखडे, शितल महांगडे, पल्लवी भोसले, लतिका गायकवाड, सुप्रिया संकपाळ, पुनम जाधव, मोनिका चव्हाण, सोनाली दरेकर परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
विद्रुपीकरण थांबवा
ऐतिहासिक ठिकाणावर लोक श्रद्धेने येत असतात. पण काही पर्यटक आपली नावे टाकून विद्रुप करतात, पर्यटक आपल्याजवळील बाटल्या, मोकळ्या पिशव्या कोठेही टाकत असतात. त्यामुळे पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होतो. लोकांनी सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व ओळखून गडावर आल्यावर मंदीरापाशी ठेवलेल्या कचरा कुंडीमध्ये कचरा टाकावा व स्वच्छता राखून गटाचे पावित्र्य ठेवावे.