शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

वाई, महाबळेश्वर, पाचगणीतील कोंडीवर उपाय काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:07 IST

वाई : महाबळेश्वर, पाचगणी, वाई येथे पर्यटकांच्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, वाहतूक कोंडी टाळून वाहतूक सुरळीत ...

वाई : महाबळेश्वर, पाचगणी, वाई येथे पर्यटकांच्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, वाहतूक कोंडी टाळून वाहतूक सुरळीत होईल, असा प्रयत्न करावा, असे आवाहन प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी केले.

महाबळेश्वर, पाचगणी, वाई, खंडाळा येथील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाई येथे आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे-खराडे, तहसीलदार रणजित भोसले, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील, सहायक निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.

संगीता राजापूरकर-चौगुले म्हणाल्या, ‘कोविड प्रादुर्भावानंतर पर्यटन स्थळे खुली करण्यास परवानगी मिळाल्याने आगामी काळात महाबळेश्वर, पाचगणी, वाई या परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक येण्याची शक्यता असते. वाई-महाबळेश्वर रस्त्यावर पसरणी घाट, पाचगणी टोल नाका, पाचगणी बाजारपेठ, भोसे खिंड, वेण्णा लेक, महाबळेश्वर एसटी स्टँड, वाई शहरातील भीमनगर ते एसटी स्टॅन्ड परिसरात वाहनांच्या वाढत्या संख्येने वाहतूक कोंडी होत असते. कोंडी टाळण्यासाठी वाई, पाचगणी, महाबळेश्वर पोलिसांनी नियोजन करावे. शक्य तिथे एकेरी वाहतुकीचा अवलंब करावा. पाचगणी टोलनाक्यावर पालिकेने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. महाबळेश्वर-भोसे खिंड येथे रस्ते मोकळे रहावेत. वेण्णा लेक येथे बोटिंगच्या तिकिटासाठी रस्त्यापर्यंत येणाऱ्या रांगेचे नियोजन करावे. घोडेसवारीसाठी वेगवेगळ्या ठिकाणांचा अवलंब करावा. जेणेकरून तेथील गर्दी कमी होईल व रस्त्यावर वाहने वाढणार नाहीत.’

‘महाबळेश्वर येथील पालिकेच्या वाहनतळाला जाण्यासाठी व येण्यासाठी एकच मार्ग आहे. त्यामुळे गर्दी वाढून बाजारपेठेत वाहतूक कोंडी होते. तेथे जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र मार्ग तयार करावेत. महाबळेश्वर येथील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पालिकेने जास्तीचे गणवेशधारी कर्मचारी ओळखपत्रासह नेमावेत. वाईपासून महाबळेश्वरपर्यंत लावण्यात आलेले माहितीचे फलक व रस्त्याचे फलक वाहनधारकांना व पर्यटकांना दिसतील, असे लावावेत. महाबळेश्वर एसटी स्टँड परिसरात वाहने उभी करण्यास मनाई करून त्याऐवजी पालिकेने इतरत्र वाहनतळ उभारावा. या परिसरात कोणत्याही परिस्थितीत वाहतूक कोंडी होऊन रस्ता बंद होणार नाही, याची काळजी घ्यावी. नेहमी वाहतूक सुरळीत राहील, असा प्रयत्न करावा,’ अशी सूचना प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी केली.

पोलीस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी वाहतूक सुरळीत राहण्याचे, कोंडी टाळण्याचे नियोजन केले आहे.