शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Satara: वाई तालुक्यातील चित्रपट पर्यटनाला ‘हप्तेखोरी’चे ग्रहण!, निर्मात्यांनी फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 17:13 IST

स्थानिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम

पांडुरंग भिलारेवाई : निसर्गसौंदर्य आणि ऐतिहासिक वारशामुळे ‘चित्रपट निर्मात्यांचे नंदनवन’ म्हणून ओळख असलेल्या वाई शहरावर सध्या हप्तेखोर टोळ्यांचे संकट घोंगावत आहे. या संकटामुळे काही वर्षांपूर्वी हिंदी-मराठी चित्रपटांचे माहेरघर असलेले वाई आता निर्मात्यांच्या नकाशावरून हळूहळू गायब होत चालले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!कृष्णामाई घाट, मेणवली घाट, पश्चिम भागातील काही गावे, तसेच धोम धरणाचा परिसर निसर्गरम्य आहे. येथे चित्रीकरणासाठी येणाऱ्या चित्रपट पथकांना काही स्थानिक गुंडांकडून शिवीगाळ, दमदाटी व थेट पैशांची मागणी केली जाते. प्रशासकीय परवाने व सर्व शुल्क भरूनही या टोळ्या बेकायदेशीर ‘हप्ते’ मागतात.हप्ते न दिल्यास चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी दिली जाते, असे गंभीर आरोप निर्मात्यांकडून होत आहेत. या दहशतीमुळे अनेक नामांकित निर्माते वाईकडे पाठ फिरवून आता भोर तालुक्याकडे वळत आहेत. कारण भोरमध्ये ग्रामपंचायत, स्थानिक नागरिक व प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य आणि सुरक्षेची हमी मिळत असल्याचे निर्माते सांगतात.

स्थानिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम...चित्रीकरणामुळे स्थानिक युवकांना केटरिंग, ट्रान्सपोर्ट, लॉजिंग, हॉटेलिंगसारख्या क्षेत्रांत रोजगार मिळत होता. मात्र, चित्रीकरण घटल्याने अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. वाईतील हॉटेल व्यवसाय, छोटे दुकानदार आणि मजूर यांचे अर्थचक्र कोलमडू लागले आहे.

वाई पुन्हा चित्रपटनगरी व्हावीनिसर्गाने वाईला भरभरून दिले आहे; पण काही आडमुठ्या लोकांच्या दहशतीमुळे चित्रपटसृष्टीने वाईकडे पाठ फिरवली आहे. सर्वसामान्य नागरिकांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला, तर वाई पुन्हा चित्रपटनगरी म्हणून ओळख निर्माण करू शकते.

कठोर भूमिका घेण्याची गरजवाई तालुक्यात आजवर अनेक दर्जेदार हिंदी-मराठी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. शहर व तालुक्याला पुन्हा चित्रपट निर्मितीचे केंद्र बनवायचे असेल, तर हप्तेखोरांवर कठोर कारवाई, निर्मात्यांना संरक्षण देऊन प्रशासनाने ठोस भूमिका घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा वाईची ओळख केवळ पर्यटनापुरतीच मर्यादित राहील आणि रोजगाराच्या संधी कायमस्वरूपी निघून जातील, अशी भीती जाणकार व्यक्त करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Extortion Threatens Wai's Film Tourism, Producers Turn Away

Web Summary : Extortion by local gangs is driving film producers away from Wai, impacting local businesses and employment. Once a film hub, Wai risks losing its identity and economic opportunities unless authorities take decisive action against extortionists and ensure producer safety.