शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांचा कौल मतदानयंत्रात बंद

By admin | Updated: November 1, 2015 23:37 IST

आता लक्ष निकालाकडे : जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदान; तरुणांसह वृद्धांनीही बजावला मतदानाचा हक्क

सातारा : जिल्ह्यातील १७२ पैकी ९९ ग्रामपंचायतींसाठी आज (रविवारी) शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. तरुणांसह वृद्धांनीही मतदानाचा हक्क बजावत गावकारभाऱ्यांची निवड केली आहे. मतदारांनी सरपंचपदाचा कौल कोणाला दिला, याचा निकाल मतदानयंत्रात बंद झाला असून आता सर्वांचे निकालाकडे लक्ष लागले आहे. रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदानप्रक्रिया पार पडली. जावळी तालुक्यात ८४ टक्के मेढा : जावळी तालुक्यातील ८३ पैकी नऊ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. त्यापैकी २० सार्वत्रिक ग्रामपंचायतींपैकी बारा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आठ ग्रामपंचायतींसाठी ८४ टक्के मतदान झाले आहे. तसेच ६३ पोटनिवडणुकींपैकी ६२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. एका ग्रामपंच्यातीच्या पोटनिवडणुकीसाठी ८६ टक्के मतदान झाले. सर्व ठिकाणी शांततेत मतदान झाले असून, अनुचित प्रकार घडू नये म्हणून मेढा पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. ग्रामपंचायती अन् झालेले मतदान टक्केवारीत असे : आखेगणी ७०.५९, भालेघर ७९.६७, दुदुस्करवाडी ८८.७४, काळोशी ८४.०६, काटवली ७०.६३, महामुलकरवाडी ९३.६४, पवारवाडी ८७.३८, शेते ८२.५१. भिवडी पोटनिवडणूक ८६.०४ टक्के. (प्रतिनिधी) कोरेगाव तालुक्यात ८५.६५ टक्के ४कोरेगाव : तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि एका ग्रामपंचायतीच्या एका जागेच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी शांततेत ८५.६५ टक्केमतदान झाले. मतमोजणी मंगळवार दि. ३ रोजी तहसील कार्यालय आवारात होणार आहे. पाच ग्रामपंचायतींसाठी कऱ्हाडात ८० टक्के मतदान कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील चार ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व एका ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. या पाच ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८० टक्के एवढे मतदान झाले. मतदानप्रक्रिया सुरळीत पार पडली. ठिकठिकाणच्या केंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कऱ्हाड तालुक्यातील शिरगाव, कोपर्डे हवेली, तांबवे व उंब्रज या चार ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तर आकाईचीवाडी ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली. ३२ मतदान केंद्रांवरती १६० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. मतदान प्रक्रियेसाठी एका केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, तीन कर्मचारी व एक शिपाई यांची नेमणूक करण्यात आली होती. तांबवे ग्रामपंचायतीसाठी ८५ टक्के, कोपर्डे हवेली ९१ टक्के, उंब्रज ७५.०८ टक्के, शिरगाव ८५.२६ टक्के तर आकाईचीवाडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ७९.७४ टक्के मतदान झाले. मतदानप्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी रविवारी शासकीय यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली होती. शनिवारीच मतदान केंद्राधिकारी, कर्मचारी मतदान साहित्यासह संबंधित गावातील मतदान केंद्रावर दाखल झाले होते. रविवारी सकाळी साडेसात वाजता मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत मतदारांचा उत्साह कायम होता. (प्रतिनिधी) तांबवेत ८५ टक्के मतदान तांबवे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ८५ टक्के मतदान झाले. पहिल्या सत्रात मतदानाची गर्दी वाढली. त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण कमी होते. ४ हजार ८० मतदारांपैकी ३ हजार ४३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १३ जागेसाठी ३१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. पाच वॉर्डांपैकी वार्ड क्रं. १ व ५ मध्ये तिरंगी लढत झाली. वार्ड क्र. २, ३ व ४ मध्ये दुरंगी लढत झाली. उंब्रजमध्ये ७५ टक्के मतदान उंब्रज ग्रामपंचायतीसाठी ७५.०७ टक्के मतदान झाले. सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत होती. येथे १७ जागांसाठी ४८ उमेदवार रिंगणात होते. उंब्रज ग्रामपंचायतीसाठी १० हजार ७२७ मतदारांपैकी ८ हजार ५३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ४ हजार १३३ पुरुष तर ३ हजार ९२० स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वॉर्ड क्र. १ मध्ये १ हजार २९३, २ मध्ये १ हजार १३२, ३ मध्ये १ हजार ३७२, ४ मध्ये १ हजार ३५२, ५ मध्ये १ हजार ३८१ तर वार्ड क्र. ६ मध्ये १ हजार ५२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कोपर्डे हवेलीत ९१ टक्के मतदान कोपर्डे हवेली ग्रामपंचायतीसाठी ९१ टक्के मतदान झाले. सकाळी साडेसात ते दहा वाजेपर्यंत ३० टक्के मतदान झाले. त्यानंतर बारा ते तीन वाजेपर्यंत मतदानाचे प्रमाण कमी झाले. दुपारी तीन वाजल्यानंतर साडेचार वाजेपर्यंत ८५ टक्के मतदान झाले. वॉर्ड क्र. १ मध्ये ९२ टक्के, २ मध्ये ९२.६२ टक्के, वार्ड क्र. ३ मध्ये ९० टक्के, वार्ड क्र. ४ मध्ये ९२ टक्के आणि वार्ड क्र. ५ मध्ये ८७ टक्के मतदान झाले. एकूण ४ हजार ८२५ मतदारांपैकी ४ हजार ४१५ मतदरांनी मतदानाचा हक्क बजावला.