कोयनेच्या दरवाजातील विसर्ग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 14:34 IST2020-09-29T14:33:37+5:302020-09-29T14:34:42+5:30
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्ण उघडीप असून कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातील विसर्ग बंद करण्यात आला असून पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक सुरू होता. यावर्षी जून महिन्यात वेळेवर मान्सूनचा पाऊस सुरू झाला. पण, त्यानंतर पावसात खंड पडत गेला.

कोयनेच्या दरवाजातील विसर्ग बंद
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्ण उघडीप असून कोयना धरणातील पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे धरणाच्या दरवाजातील विसर्ग बंद करण्यात आला असून पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक सुरू होता.
यावर्षी जून महिन्यात वेळेवर मान्सूनचा पाऊस सुरू झाला. पण, त्यानंतर पावसात खंड पडत गेला.
जुलै महिन्यात तर तुरळक पाऊस झाला. तर आॅगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाल्याने धरणे भरु लागली. सप्टेंबर महिन्यात कोयना, तारळी धरणे भरली. तर उरमोडी, कण्हेर या सारखी धरणे काठावर आली. मात्र, गतवर्षीपेक्षा यंदा पश्चिम भागात पाऊसमान कमी राहिले आहे. त्यामुळे धरणांमधून गतवर्षीसारखा विसर्ग झाला नाही. त्यातच पश्चिम भागात दोन दिवसांपासून पावसाची उघडीप आहे.
मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला काहीच पाऊस झालेला नाही. मात्र, यंदा आतापर्यंत ४३३१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच नवजा येथे आतापर्यंत ५०५६ तर महाबळेश्वरला यंदा ५००५ तर मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सकाळच्या सुमारास कोयना धरणात १०५.१४ टीएमसी पाणीसाठा होता.
पाण्याची आवक कमी झाल्याने दरवाजातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला. तर पायथा वीजगृहातून २१०० क्यूसेक विसर्ग सुरू होता. हे पाणी कोयना नदीपात्रात जाते.