जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन ; तीन दुकानदारांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 13:46 IST2021-04-16T13:43:32+5:302021-04-16T13:46:17+5:30

CoronaVirus Collcator Satara- सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी तीन दुकानदारांवर गुन्हे दाखल केले.सातार्‍यातील पोवई नाका येथे इम्तियाज गुलाब शेख रा. कवारे कॉलनी, शाहूपुरी सातारा यांनी मीन कॉम्पुटर्स अँड हार्डवेअर सुरू ठेवल्याचे दि. १४ रोजी निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चेतन ठेपणे यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार कारळे हे अधिक तपास करीत आहेत.

Violation of the Collector's order; Crimes against three shopkeepers | जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन ; तीन दुकानदारांवर गुन्हे

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन ; तीन दुकानदारांवर गुन्हे

ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन तीन दुकानदारांवर गुन्हे

सातारा : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी तीन दुकानदारांवर गुन्हे दाखल केले.सातार्‍यातील पोवई नाका येथे इम्तियाज गुलाब शेख रा. कवारे कॉलनी, शाहूपुरी सातारा यांनी मीन कॉम्पुटर्स अँड हार्डवेअर सुरू ठेवल्याचे दि. १४ रोजी निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चेतन ठेपणे यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार कारळे हे अधिक तपास करीत आहेत.

साताऱ्यातील पंतांचा गोट येथे संभाजी महादेव शिंदे (रा. गोडोली, सातारा) यांनी दि. १४ रोजी अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असूनही शिंदे यांनी प्लास्टिक नॉयलॉन दुकान सुरू ठेवल्याचे आढळून आले. याप्रकरणी जिल्हा विशेष शाखेचे पोलीस कर्मचारी राहूल खाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिंदे यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार कारळे हे करत आहेत.

त्याचप्रमाणे पोवई नाक्यावरील रविराज स्टिल सेंटर हे दुकान सुरू होते. याप्रकरणी अतुल मोहन कुंदक (रा. रविवार पेठ, सातारा) यांच्याविरोधात पोलीस कॉन्स्टेबल चेतन ठेपणे यांनी तक्रार दिली. त्यानुसार कुंदक यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Violation of the Collector's order; Crimes against three shopkeepers