पोलीस कर्तव्य मेळाव्यात विजय कुंभार यांना सुवर्णपदक
By Admin | Updated: April 8, 2015 00:32 IST2015-04-07T20:19:48+5:302015-04-08T00:32:15+5:30
पंजाबमधील फिल्लोर येथे अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा झाला. या मेळाव्यात ‘संगणक कौशल्य’ या स्पर्धा प्रकारात नेतृत्व करताना

पोलीस कर्तव्य मेळाव्यात विजय कुंभार यांना सुवर्णपदक
सातारा : पंजाब येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात पोलीस अधिकारी विजय संभाजी कुंभार यांनी प्रथम क्रमांकाबरोबरच सुवर्णपदक प्राप्त केले.पंजाबमधील फिल्लोर येथे अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा झाला. या मेळाव्यात ‘संगणक कौशल्य’ या स्पर्धा प्रकारात महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे नेतृत्व करताना पोलीस अधिकारी
विजय कुंभार यांनी सुवर्णपदक मिळविले. अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात या स्पर्धा प्रकारात महाराष्ट्र पोलीस दलाला प्रथमच सुवर्णपदक मिळालेले आहे. विजय कुंभार हे पुणे येथील पोलीस महासंचालक, बिनतारी विभागात कार्यरत आहेत. या यशाबद्दल कुंभार यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे. (प्रतिनिधी)