शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

VIDEO- साता-यात विद्युत खांब कोसळून तिघे जखमी !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 7:28 PM

सातारा, दि. 10 - येथील पंताचा गोट परिसरात दुपारी साडे तीनच्या सुमारास विजेचा खांब तुटून झालेल्या अपघातात वायरमनसह तीन ...

सातारा, दि. 10 - येथील पंताचा गोट परिसरात दुपारी साडे तीनच्या सुमारास विजेचा खांब तुटून झालेल्या अपघातात वायरमनसह तीन जण जखमी झाले आहेत. रस्त्यावर खांब कोसळताच शेजारून निघालेले पादचारीही घाबरले. जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेतील सर्व दृश्ये सीसीटीव्ही कॅमे-यात  कैद झाली आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, पंताचा गोट परिसरात दुपारी तीनच्या सुमारास विद्युत बिघाडाची तपासणी करण्यासाठी महावितरण कंपनीचे कर्मचारी विजेच्या खांबावर चढले होते. शिडी लावून खांबावर चढलेले वायरमन विद्युत बिघाड दुरुस्तीचे काम करीत असल्याचे अनेकजण पाहात होते. तेवढ्यात कट्ट असा आवाज होऊन वायरमनसह विद्युत खांब रस्त्यावर कोसळला. ही घटना घडताच तातडीने परिसरातील नागरिकांनी जखमींकडे धाव घेतली. विद्युत पुरवठा खंडीत असल्याची खात्री करून जखमींना रुग्णालयाकडे नेण्यात आले. खांब कोसळल्यामुळे रस्त्यावर लावण्यात आलेल्या दुचाकींचेही नुकसान झाले आहे. पंताचा गोट येथील प्रकाश लॉज जवळ दुपारी खांबावर तीन कर्मचारी कमा करत होते. दुपारी पावसाची रिमझिम होती, त्यामुळे खांबही घसरडे झाले होते. तर कर्मचा-यांकडे देखील सुरक्षिततेची कोणतीच साधने नव्हती. त्यामुळे भर पावसात ५० फुटांहून अधिक उंचीवर हे तीन कर्मचारी तोल सांभाळत काम करत होते. या खांबावर उच्च दाबाची अर्थींग तार बसविण्याचे काम सुरू होते. मुळातच या खांबावर उच्च दाबाची विद्युत वाहिनी व लघु दाबाची विद्युत वाहिनी अशा दोन प्रकारच्या तारा होत्या.