अधिकाऱ्यांवर दबाब आणून विजय

By Admin | Updated: July 7, 2015 22:27 IST2015-07-07T22:27:56+5:302015-07-07T22:27:56+5:30

अविनाश मोहिते : कऱ्हाडात संस्थापक पॅनेलच्या मेळाव्यात विरोधकांवर टीकास्त्र

Victory over the officials and victory | अधिकाऱ्यांवर दबाब आणून विजय

अधिकाऱ्यांवर दबाब आणून विजय

कऱ्हाड : कृष्णा कारखान्याची पाच वर्षापूर्वीची निवडणूक ऐतिहासिक अशी झाली होती. त्यानंतर पाच वर्षात संस्थापक पॅनेलच्या माध्यमातून जी कामे केली ती सभासदांना माहिती आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा आणि सत्तेचा वापर झाला. विरोधकांनी राजकीय ताकदीच्या जोरावर अधिकाऱ्यांवर दबाव आणून निवडणूक जिंकली आहे. त्यांनी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळे अधिकारी मॅनेज केले. मतमोजणीवेळी झालेल्या गैरप्रकाराबाबत आम्ही न्यायालयात जाणार आहोत. मॅचफिक्सींग ज्याप्रमाणे होते, त्याप्रमाणे या निवडणूकीत मतमोजणीवेळी मतांचीही फिक्सींग झाल्याचा प्रकार घडला आहे. असे मत संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहिते यांनी व्यक्त केले.
यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना निवडणूकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर संस्थापक पॅनेलतर्फे मंगळवारी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, शेकापचे नेते अ‍ॅड. रवींद्र पवार, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील-शेरेकर, अशोक थोरात, अ‍ॅड. सी. बी. कदम आदींसह कऱ्हाड, वाळवा, कडेगाव तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.
अविनाश मोहिते म्हणाले, निवडणूकीत सहकार पॅनेल व रयत पॅनेलच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात आमच्या विरोधात कारस्थाने रचली. मतांसाठी सभासदांच्या खिशात जबरदस्तीने पैसे खिशात घातले. तरी सुद्धा सभासदांनी संस्थापकला जास्त मते दिली आहेत. आज फेरमतमोजणी के ल्यास दिसून येईल की कोणाला किती मते पडली आहेत. त्यामुळे आम्ही या फेममतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी संजीव देशमुख यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत.
आज हा कारखाना चुकीच्या माणसाच्या हातात गेला आहे. कृष्णा कारखान्याच्या जिवावर जयवंत शुगर, ट्रस्ट उभे राहिले आहे. कारखान्याकडे लाकूड शिल्लक नाही असे, सांगणाऱ्यांना माहिती नाही की, कारखान्याकडे अजुनही ९० लाख साखरेची पोती, २० लाख टन मोलॅसिस तसेच लाकूड शिल्लक आहे.
जर कारखान्याच्या सभासदांना ऊसाचा कमी दर दिला तर याद
राखा, जयवंत शुगरमध्ये ज्यापद्धतीने काटेमारी केली जाते त्याप्रमाणे कृष्णा कारखान्यात काटेमारी होवू
देणार नाही. कारखान्याच्या
माध्यमातून जयवंत शुगर चालविण्याचा प्रयत्न केल्यास त्यानां जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही. असे मत संस्थापक पॅनेलचे
प्रमुख अविनाश मोहित यांनी व्यक्त केले.
निवडणूकीत भानगडी करून मते खाता येतात मात्र, माणसे तोडता येत नाहीत. निवडणूकीत मतमोजणी झाली त्यामध्ये सात हजाराहून अधिक मते बाद निघाली. ती नक्की बाद झाली आहेत का हे पहाणे गरजेचे आहे. संस्थापकच्या या निवडणूकीच्या व न्यायालयाच्या लढाईत
श्रमिक मुक्ती दल तुमच्या पाठिशी असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी मत व्यक्त
केले. (प्रतिनिधी)

पोराला जरा आवरा,
सहकार पॅनेलच्या सुरेश भोसलेंनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की, त्यांनी त्यांच्या पोराला आवरावे. तो काहीही बोलतोय, त्याच त्याला कळत नाही की, काय बोलावं अन् काय नाहीते. आदीच पोराला झेड सिक्युरिटी लागते. याचं भान त्यांनी ठेवावं. अशा शब्दात संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहिते यांनी सुरेश भोसले व अतुल भोसले यांचा खरपूस समाचार घेतला.

Web Title: Victory over the officials and victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.